तुटलेल्या विद्युत तारा दहा दिवसापासून पडूनच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:05 AM2021-05-14T04:05:41+5:302021-05-14T04:05:41+5:30
आडूळ : अंतरवाली खांडी शिवारात दहा दिवसापूर्वी जोरदार वादळी वाऱ्याने तुटलेल्या विद्युत तारा महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी अद्यापपर्यंतही जोडल्या नाही. त्यामुळे ...
आडूळ : अंतरवाली खांडी शिवारात दहा दिवसापूर्वी जोरदार वादळी वाऱ्याने तुटलेल्या विद्युत तारा महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी अद्यापपर्यंतही जोडल्या नाही. त्यामुळे अर्धे गाव अंधारात गेले असून, नागरिकांना सलग दहा दिवसापासून अडचणींचा सामना करावा लागत आहे.
अंतरवाली खांडी शिवारात ४ मे रोजी जोरदार वादळी वारे झाल्याने अनेकांच्या घरावरील पत्रे उडून पडझड होऊन नुकसान झाले होते. वादळी वाऱ्याच्या दाबाने विजेचे खांब वाकून अनेक ठिकाणी विद्युत तारा तुटून पडल्या. दहा दिवस उलटूनही महावितरणच्या वतीने अद्यापही तुटलेल्या तारा जोडण्यात आल्या नाही. परिणामी अर्धे गाव अंधारात आहे. त्याचबरोबर फळबागांचे मोठे नुकसान होऊनही महसूल विभागाच्या एकाही अधिकाऱ्यांनी अजूनपर्यंत घटनास्थळी येऊन पंचनामा केला नाही, हे विशेष. यासंंदर्भात महावितरणचे आडूळचे सहायक अभियंता महेश कुंभारे यांच्याकडे तक्रार केली. मात्र, त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. अर्ध्या गावातील वीज पुरवठा खंडित झाल्याने ग्रामपंचायतीचे वॉटर फिल्टर मशीनही बंद पडले आहे. विद्युत तारा जोडून खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी सरपंच शशिकला डिघुळे, उपसरपंच नवनाथ कळमकर, रामनाथ डिघुळे आदी ग्रामस्थांनी केली आहे.
130521\img-20210513-wa0069.jpg
अंतरवाली खांडी गावात अशाप्रकारे वाटेतच विद्युत तारा पडून आहेत.