भाऊ - बहिणींवर काळाचा घाला; कामावर जात असताना ट्रकने दुचाकीवरील तिघांना चिरडले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2022 10:38 AM2022-11-24T10:38:47+5:302022-11-24T10:39:11+5:30
बहिणीला कंपनीत कामावर सोडण्यासाठी जाताना काळाचा घाला
वाळूजमहानगर (औरंगाबाद) : कंपनीत कामासाठी दोघा बहिणीला सोडण्यासाठी जाणाऱ्या दुचाकीला ट्रकने धडक दिल्याने दुचाकीस्वार तिघेही बहीण-भाऊ ट्रकच्या चाकाखाली सापडून ठार झाले . हा भीषण अपघात आज गुरुवारी सकाळी 8 वाजेच्या सुमारास वाळूज उद्योग नगरीत घडला.
या विषयी प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार दीपक कचरू लोखंडे 20, रा.ओम साईनगर, रांजणगाव) हा आज गुरुवारी सकाळी मोठी बहीण अनिता (22)व लहान बहीण निकिता (18)या दोघींना दुचाकी (क्रमांक एम एच 21,ए एम 6995) वरून त्यांना कंपनीत कामावर सोडण्यासाठी चालला होता. रांजणगाव फाटा येथून उद्योग नगरीतील रेणुका ऑटो या कंपनीत जात असताना सकाळी 8 वाजेच्या सुमारास एनआरबी चौकलगत दीपक याच्या दुचाकीला ट्रकने (क्रमांक एम एच 04,एफ जे 5288) धडक दिली. या अपघातात ट्रकच्या चाकाखाली सापडून तिघेही बहीण- भाऊ गंभीर जखमी होऊन त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच रांजणगाव चे माजी उपसरपंच अशोक शेजुळ, रामचंद्र पाटील, शिवगिर गिरी, रोहिदास मारकवड, सुरेश गायकवाड यांनी तिघांना रुग्णवाहिकेतुन शासकीय रुग्णालयात दाखल केले.