ब्रदरच्या प्रसंगावधानाने चोरी टळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:04 AM2021-05-22T04:04:57+5:302021-05-22T04:04:57+5:30

औरंगाबाद : घाटीत चोरांचा सुळसुळाट झाला आहे. आठवड्यात तिसरी दुचाकी चोरी झाली. तोच शुक्रवारी ब्रदरच्या प्रसंगावधानामुळे ऑपरेशन थिएटर क्रमांक ...

Brother's foresight prevented the theft | ब्रदरच्या प्रसंगावधानाने चोरी टळली

ब्रदरच्या प्रसंगावधानाने चोरी टळली

googlenewsNext

औरंगाबाद : घाटीत चोरांचा सुळसुळाट झाला आहे. आठवड्यात तिसरी दुचाकी चोरी झाली. तोच शुक्रवारी ब्रदरच्या प्रसंगावधानामुळे ऑपरेशन थिएटर क्रमांक १ मधून रुग्णांचे इम्लांट चोरी करताना एकाला रंगेहात पकडले. त्यावेळी चोरट्याने ते साहित्य परत करून गयावया करायला सुरुवात केली. याप्रकरणी वैद्यकीय अधीक्षक डाॅ. सुरेश हरबडे यांनी पोलिसांत तक्रार देण्याच्या सूचना ब्रदरला केल्या असल्याचे सांगितले.

शासकीय परिचारिका युनियनच्या इंदुमती थोरात म्हणाल्या, घाटी रुग्णालयात उपलब्ध नसलेले ऑपरेशनसाठी लागणारे इम्लांट बाहेरून मागविण्यात येतात. शुक्रवारी एका रुग्णाच्या ऑपरेशनसाठी मागवलेल्या इम्लांट टेबलवर ठेवलेले होते. हे इम्लांट पुरवठा करणाऱ्या दोनपैकी एका पुरवठादाराचा कर्मचारी संदीप बैरागी हा कसा काय आला म्हणून ब्रदर दादासाहेब कसाटे यांना शंका आली. त्यांनी शहानिशा करताच इम्लांट चोरल्याने त्यांनी संदीपला पकडून विचारपूस केली, तर त्याने अखेर बॅगमधून इम्लांट काढून दिला. त्यामुळे रुग्णांचे आर्थिक नुकसान टळून ऑपरेशन थिएटरमधील चोरी उघडकीस आली. त्यामुळे संघटनेकडून ब्रदरच्या प्रसंगावधानाचे काैतुक करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत पोलिसांत तक्रार देण्याची प्रक्रिया सुरू होती.

Web Title: Brother's foresight prevented the theft

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.