राज्यात ब्रुसुलोसीस आजाराचे होणार उच्चांटन
By Admin | Published: June 13, 2014 11:41 PM2014-06-13T23:41:22+5:302014-06-14T01:19:29+5:30
परभणी : ब्रुसुलोसीस हा आजार गाय व म्हैस या जनावरांपासून माणसांना होतो. शासनाने यावर्षांपासून ४ ते १२ महिन्यातील जनावरांचे लसीकरण करून या आजाराचे राज्यातून समुळ उच्चाटन करण्याचे निश्चित केले आहे.
परभणी : ब्रुसुलोसीस हा आजार गाय व म्हैस या जनावरांपासून माणसांना होतो. शासनाने यावर्षांपासून ४ ते १२ महिन्यातील जनावरांचे लसीकरण करून या आजाराचे राज्यातून समुळ उच्चाटन करण्याचे निश्चित केले आहे.
ब्रुसुलोसीस हा आजार जनावरांपासून माणसांना होणारा आजार आहे. मुख्यत: गाय व म्हशीमध्ये हे जीवाणू दिसून येतात. या आजारामुळे माणसाला ताप येणे, गुडघे दुखी, शरीर अशक्त होणे, भूक मंदावने आदी लक्षणे दिसतात. या आजाराचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पशूसंवर्धन विभागाच्या वतीने १ जुलैपासून ४ ते १२ महिन्यांच्या मादी वासरांना लस दिली जाणार आहे. त्यामुळे या आजारावर प्रतिबंध होणार आहे. प्रत्येक पशूवैद्यकीय दवाखान्याला वर्षभरात ५०० लसीकरणाचे उद्दिष्ट दिले आहे, अश्ी माहिती जिल्हा परिषदेचे पशूसंवर्धन अधिकारी डॉ. अरविंद देशपांडे यांनी दिली आहे.
लसीकरण मोहीम पशूपालकांनी आपल्या मादी-वासरांना लस टोचून घ्यावी. लस टोचल्यानंतर वासरांना ताप येणे व चारा न खाणे ही लक्षणे दिसून येण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी घाबरून न जाता लसीकरण करून घ्यावे, जेणे करून आपल्या मुलांना या आजारापासून बचाव करता येईल तसेच पुढील पिढी सशक्त निर्माण करता येईल, असे डॉ. अरविंद देशपांडे यांनी बोलतांना सांगितले. (प्रतिनिधी)
सहा बालकांना आजार
२०११ मध्ये परभणी जिल्ह्यातील सहा बालकांना ब्रुसुलोसीस हा आजार जडला होता. या संदर्भात बालरोग तज्ज्ञांनी जि.प. पशूसंवर्धन अधिकारी डॉ. अरविंद देशपांडे यांच्याशी संपर्क साधून आजाराची लक्षणे जाणून घेतली होती. त्यानंतर हा आजार असल्याचे निष्पन्न झाले.
कच्चे दूध जनावरांच्या गर्भाशयाच्या स्त्रावामधील जंतू, डोळे अथवा खान्यातून या आजाराचा प्रसार होतो.
चार ते बारा महिन्यातील मादी वासरांना लसीकरण करण्यासाठी नामामात्र एक रुपये सेवा शुल्क आकारण्यात येणार आहे. याचा लाभ पशूपालकांनी घ्यावा, असे आवाहन केले आहे.
पशूसंवर्धन अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण चर्चासत्र
ब्रुसुलोसीस या आजाराचे उच्चाटन करण्यासाठी जिल्हा परिषद पशूसंवर्धन विभागाच्या वतीने १३ जून रोजी सकाळी ११ वाजता जि.प.च्या सभागृहात पशूवैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण चर्चासत्र घेण्यात आले. यावेळी व्यासपीठावर वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठातील पशूवैद्यकीय डॉ. मार्कण्डेय, जिल्हा पशूसंवर्धन संचालनालयाचे डॉ. प्रल्हाद कांबळे, जि.प.चे जिल्हा पशूसंवर्धन अधिकारी डॉ. अरविंद देशपांडे, डॉ. सोनटक्के, डॉ. बुचाले, डॉ. भंडारी आदींची उपस्थिती होती. या चर्चासत्रात तालुक्यातील पशूवैद्यकीय अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.