लासूर स्टेशनच्या बीएसएनएलचा कारभार एकाच अधिकाऱ्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:06 AM2021-09-26T04:06:16+5:302021-09-26T04:06:16+5:30
लासूर स्टेशन : येथील बीएसएनएल केंद्राच्या अधिकाऱ्यांवर तालुक्यातील कामकाजाचा ताण पडला आहे. रोजंदारी कामगारांवर दूरध्वनी केंद्राची भिस्त असून ग्राहकांना ...
लासूर स्टेशन : येथील बीएसएनएल केंद्राच्या अधिकाऱ्यांवर तालुक्यातील कामकाजाचा ताण पडला आहे. रोजंदारी कामगारांवर दूरध्वनी केंद्राची भिस्त असून ग्राहकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
लासूर स्टेशन हे गंगापूर तालुक्यातील सर्वाधिक मोठे बाजारपेठेचे गाव आहे. बँक, अडत दुकान आदी शासकीय निमशासकीय कार्यालयात बीएसएनएलच्या नेटवर्कचा वापर केला जातो; परंतु येथील नेटवर्क कायमच बंद राहत असल्याने ग्राहकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ग्राहकांच्या समस्या सोडविण्यासाठी येथील बीएसएनएल कार्यालयात एक अधिकारी आहे. त्यामुळे ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण काही केल्या होईना. एकाच अधिकाऱ्याला संपूर्ण तालुक्याचा कारभार सांभाळावा लागत आहे. तर नागरिकांना कायमस्वरूपी अधिकारी नेमला जावा, अशी मागणी केली जात आहे.
-----------
आमच्या बँकेचा लँडलाईन नंबर एका महिन्यापासून बंद आहे. आम्हाला अनेक अडचणींशी सामना करावा लागत आहे; मात्र अनेकवेळा दूरध्वनी केंद्रावर फेऱ्या मारून मागणी करून विनंती अर्ज देऊन देखील दुरुस्ती केली जात नाही. त्यामुळे ग्राहकांना वेळेवर सेवा देता येत नाही. - जितेंद्र जैन, शाखा व्यवस्थापक, कोपरगाव बँक.