बीएसएनएलची सेवा आठवडाभरापासून ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:05 AM2021-05-22T04:05:22+5:302021-05-22T04:05:22+5:30
बाजारसावंगी येथील दूरसंचार कार्यालयातर्फे ताजनापूर, येसगाव, दरेगाव, पाडळी, सोबलगाव, झरी, वडगाव, ...
बाजारसावंगी येथील दूरसंचार कार्यालयातर्फे ताजनापूर, येसगाव, दरेगाव, पाडळी, सोबलगाव, झरी, वडगाव, लोणी, बोडखा, धामणगाव, रेल, इंदापूर या भागांत दूरसंचार सेवा पुरवली जाते. ही सेवा बँका, पोस्ट तथा शासकीय कार्यालये, पवनऊर्जा कार्यालयात वापर केला जातो. मात्र, येथील बीएसएनएलच्या कार्यालयात तसेच खुलताबाद कार्यालयात एकही कर्मचारी नाही. बाजारसावंगी येथील कार्यालय हे पंधरा दिवसांपासून हंगामी कर्मचाऱ्यांच्या भरवशावर सुरू आहे. यामुळे या भागातील दूरसंचार सेवा एक ते दोन आठवडे तर कधी महिनाभर विविध कारणांमुळे बंद पडत आहे. या विस्कळीत सेवेमुळे अनेक मोबाईल सिम वापरणाऱ्या ग्राहकांनी दुसऱ्या कंपनीचे सिमकाॅर्ड वापरणे सुरू केले आहे. त्यामुळे विस्कळीत झालेली ही सेवा पुन्हा पूर्ववत करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.