२४ कोटींचा अर्थसंकल्प
By Admin | Published: March 26, 2017 10:59 PM2017-03-26T22:59:52+5:302017-03-26T23:00:59+5:30
बीड : जिल्हा परिषदेच्या २०१७-१८ या आर्थिक वर्षासाठी उणे २४ कोटी ७७ लाख ५ हजार ५५१ रुपयांच्या अंदाजपत्रकाला सीईओ नामदेव ननावरे यांनी नुकतीच मंजुरी दिली आहे.
बीड : जिल्हा परिषदेच्या २०१७-१८ या आर्थिक वर्षासाठी उणे २४ कोटी ७७ लाख ५ हजार ५५१ रुपयांच्या अंदाजपत्रकाला सीईओ नामदेव ननावरे यांनी नुकतीच मंजुरी दिली आहे. सर्वाधिक पाच कोटी रुपयांची तरतूद पंचायत राज कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी करण्यात आली आहे. गतवर्षीच्या तुलनेत दोन कोटी रुपयांची तूट भरुन काढण्यात आली हे या अर्थसंकल्पाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.
लेखा व वित्त विभागाने २०१६-१७ च्या उणे २४ कोटी ८७ लाख ६३ हजार ५५१ रूपयांच्या सुधारित अंदाजपत्रकाला देखील सीईओंनी मान्यता दिली. नूतन पदाधिकारी निवड प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर शासनाने जि.प.च्या अर्थसंकल्पाला मान्यता देण्याचे अधिकार सीईओंना दिले होते. याचा वापर करून ननावरे यांनी अर्थसंकल्पावर मान्यतेची मोहोर उमटवली. १ एप्रिल रोजी जिल्हा 3परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये हा अर्थसंकल्प अवलोकनार्थ मांडण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)