'रेड्याच्या मुखी वेद बोलविला'; ऐतिहासिक घटनेस झाले ७३३ वर्ष पूर्ण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2020 06:21 PM2020-01-30T18:21:08+5:302020-01-30T18:22:41+5:30

संत ज्ञानेश्वर महाराजांनी पैठणच्या नागघाटावर रेड्याच्या मुखातून वेद म्हणून घेतले होते.

'Buffalo speaks Vedas'; Saint Gyaneshwar Maharaja's Historical event took place 733 years | 'रेड्याच्या मुखी वेद बोलविला'; ऐतिहासिक घटनेस झाले ७३३ वर्ष पूर्ण 

'रेड्याच्या मुखी वेद बोलविला'; ऐतिहासिक घटनेस झाले ७३३ वर्ष पूर्ण 

googlenewsNext

             रेड्यामुखी वेद बोलविला 
              गर्व द्विज्यांचा हरविला।।

मुंजीसाठी शुद्धीपत्र मिळविण्या करीता संत ज्ञानेश्वर महाराजांनी पैठणच्या नागघाटावर रेड्याच्या मुखातून वेद म्हणून घेतले होते. या घटनेला आज वसंत पंचमीला ७३३ वर्ष पूर्ण झाले, यानिमित्ताने संत ज्ञानेश्वर महाराज भक्त मंडळाच्या वतीने रेड्याच्या मुर्तीस अभिषेक घालून परंपरेनुसार नागघाटावर वसंत पंचमी उत्सव साजरा करण्यात आला.

रेड्याच्या डोक्यावर हात वेदाचे उच्चार रेड्याच्या मुखातून...
गोदाकाठावरीर सर्वात प्राचिन घाट म्हणून नागघाट ओळखला जातो. हा घाट सातवाहनकालापासून अस्तित्वात आहे.  नागडोह म्हणून महानुभावांच्या साहित्यात नागघाटाची नोंद आहे. याच नागघाटावर ज्ञानेश्वरांनी रेड्यामुखी वेद वदविण्याचा चमत्कार करून दाखविला,  संत निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान-मुक्ताबाई  ही भावंडे पैठण धर्मपीठाच्या अधिकारी मंडळीकडून शुद्धीपत्र घेण्यासाठी नागघाटावर आले होते. तेव्हा एकाने  ज्ञानेश्वरांना,  तू जिवाशिवाचे तत्त्वज्ञान सांगतोस मग रेड्याच्या मुखातून वेद म्हणवून दाखव असे आव्हान दिले. तेथून एक रेडा चालला होता. ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि वेदांचे उच्चारण रेड्याच्या मुखातून होऊ लागले. त्यावेळी ज्ञानेश्वर महाराजांचे वय अवघे १२ वर्षांचे होते. या घटनेने नागघाटाचे महत्त्व आजही अबाधित आहे.

नागघाट राष्ट्रीय स्मारक घोषित करा....
अनेक महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनांचा साक्षिदार असलेला गोदावरी काठावरील नागघाट अत्यंत प्राचीन वास्तू आहे. नागघाटाच्या परिसरात शालिवाहन राजवटीचे अवशेष आजही उभे असून ते पुरातत्व खात्याच्या ताब्यात आहेत. एतिहासिक वारसा असलेल्या नागघाटास राष्ट्रीय स्मारक करा अशी मागणी सातत्याने होत असून  या मागणीची दखल अद्याप पुरातत्व खात्याने घेतली नाही.

पैठणकरांनी उत्साहात केला साजरा  
नागघाटावरील रेड्याच्या मुर्तीस द्वारकाबाई तांगडे व सुमनबाई मांदळे यांच्या हस्ते व महेश शिवपूरी यांच्या मंञघोषात अभिषेक घालण्यात आला. यावेळी बंडेराव जोशी यांनी ज्ञानेश्वरीच्या मुखोद्गत असलेल्या ५०० ओव्यांचे पारायण केले. सामाजिक कार्यकर्ते दिनेश पारीख, बन्सीलाल चावक, अँड. चंद्रशेखर कुलकर्णी, विष्णू ढवळे, संतोष छडीदार, रमेश खांडेकर, सतिष सराफ, भिमसिंग बुंदिले, जगन्नाथ जमादार, रावसाहेब गोर्डे, शंकर खंदाडे, शहादेव लोहारे आदींनी यावेळी मनोगत व्यक्त केले. 

उत्सव यशस्वी करण्यासाठी भालचंद्र बेंद्रे, गणेश बांगर, धनराज चितलांगी, प्रशांत हिंगे, किशोर भाकरे, जितू घोडके, जना मिटकर, नवनाथ वडेकर, श्रीरंग मडके, प्रकाश रावस, सुयश शिवपूरी, संजय पाटील, ईश्वर म्हस्के, रमेश पाठक, स्वप्निल देवरे, अशोक महेपडे, अरविंद तांगडे, राजू भंडारी, अनिल सराफ, गोविंद शिंदे, प्रसाद ख्रिस्ती, गोकूळ वरकड, पंडीत बोंबले, योगेश साबळे, संतोष कुलकर्णी, तुकाराम बडसल, पियुष सराफ, लालू जव्हेरी, मंदार उज्जैनकर, सुनील जगधने, केदार मिरदे, मुकेश सोनारे, विलास उफाड, राजू लोहीया आदींनी विशेष परीश्रम घेतले. रेड्याच्या दगडी मुर्तीवर पुष्पवृष्टी करून महा आरतीने कार्यक्रमाची सांगता झाली.

Web Title: 'Buffalo speaks Vedas'; Saint Gyaneshwar Maharaja's Historical event took place 733 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.