बांधकाम व्यावसायिकाच्या कारची काच फोडून साडेचार लाख पळवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 04:11 PM2019-02-25T16:11:56+5:302019-02-25T16:14:36+5:30

दिवसाढवळ्या वर्दळीच्या ठिकाणी झालेल्या या चोरीने खळबळ उडाली आहे.

The builders four and a half million stolen by broke tha car's glass | बांधकाम व्यावसायिकाच्या कारची काच फोडून साडेचार लाख पळवले

बांधकाम व्यावसायिकाच्या कारची काच फोडून साडेचार लाख पळवले

googlenewsNext

औरंगाबाद : बांधकाम व्यावसायिकाने ऑफिससमोर उभी केलेल्या कारची काच फोडून त्यातील साडे चार लाख रुपये चोरट्यांनी पळवल्याची घटना कोकणवाडी येथे आज दुपारी २.३० वाजेच्या सुमारास घडली. पांढऱ्या रंगाच्या दुचाकीवर आलेल्या दोघा चोरट्यांनी रक्कम पळवल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. दिवसाढवळ्या वर्दळीच्या ठिकाणी झालेल्या या चोरीने खळबळ उडाली आहे.

निवृत्ती सूर्यवंशी यांचा बांधकाम कन्सल्टंसीचा व्यवसाय आहे. आज दुपारी त्यांनी आकाशवाणी येथील एसबीआय बँकेतून ४ लाख ५५ हजाराची रक्कम काढली. यातील पाच हजार रुपये खिशात ठेवत त्यांनी उरलेली रक्कम बांधकाम व्यवसायिक मित्र सचिन कासलीवाल यांच्या कारमध्ये (एमएच २० सीएच ४४०६ ) ठेवली. यानंतर ते दोघेही कारमधून कोकणवाडी परिसरातील जय टॉवर येथील सूर्यवंशी यांच्या कार्यालयाकडे आले. गाडी कार्यालयासमोर उभी करून दोघेही आत गेले. कंत्राटाबाबत काही माहिती घेऊन सूर्यवंशी आणि कासलीवाल पाच मिनिटातच बाहेर आले. यावेळी बाहेर उभ्या कारची काच फोडून त्यातील ४ लाख ५० हजाराची रक्कम चोरट्यांनी पळवल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. 

घटनेची माहिती मिळताच डीसीपी निलेश खाटमोडे, एसीपी नागनाथ कोडे, गुन्हे शाखेचे मधुकर सावंत, वेदांत नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर रोडगे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. पांढऱ्या रंगाच्या दुचाकीवर आलेल्या दोघा चोरट्यांनी रक्कम पळवल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. मागील काही दिवसांपासून याच पद्धतीने दिवसाढवळ्या दुचाकीवर येऊन रक्कम पळविण्याच्या घटना वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. 

Web Title: The builders four and a half million stolen by broke tha car's glass

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.