गुप्त मोबाईल नंबर ठरला बिल्डरांच्या अटकेचा मार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 11:54 PM2018-10-24T23:54:07+5:302018-10-24T23:54:31+5:30

बांधकाम व्यावसायिकाची ४५ कोटींची फसवणूक केल्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपीचा गुप्त मोबाईल नंबर मिळविण्यात मुंबई पोलिसांना यश आले आणि हा नंबरच बिल्डर विनोद सुराणा आणि संतोष मुथियानपर्यंत मुंबई पोलिसांना घेऊन गेला.

 Builder's way of being a secret mobile number | गुप्त मोबाईल नंबर ठरला बिल्डरांच्या अटकेचा मार्ग

गुप्त मोबाईल नंबर ठरला बिल्डरांच्या अटकेचा मार्ग

googlenewsNext



औरंगाबाद : बांधकाम व्यावसायिकाची ४५ कोटींची फसवणूक केल्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपीचा गुप्त मोबाईल नंबर मिळविण्यात मुंबई पोलिसांना यश आले आणि हा नंबरच बिल्डर विनोद सुराणा आणि संतोष मुथियानपर्यंत मुंबई पोलिसांना घेऊन गेला. विशेष म्हणजे मुंबई आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी तीन दिवसांपासून शहरात तळ ठोकून होते. बिल्डरांच्या अटकेने शहरातील बांधकाम व्यवसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
आरोपींनी तक्रारदार गुप्ता यांना करारानुसार फ्लॅट दिले नाही आणि पैसे परत करण्यासाठी दिलेले धनादेशही अनादरित केले. याप्रकरणी मुंबईतील जुहू पोलीस ठाण्यात दोन्ही बिल्डरांविरोधात गुन्हा नोंद आहे. अटकेच्या भीतीपोटी दोन्ही बिल्डर फरार झाले होते.
तीन दिवस शहरात मुक्काम केल्यांनतर लागले हाती
पोलिसांना सतत गुंगारा देणारे दोन्ही बिल्डर आरोपी हे अटकेच्या भीतीपोटी सकाळीच घरातून बाहेर पडत आणि रात्री उशिरा घरी परतत. यामुळे सहसा ते कोणाच्याही नजरेस पडत नव्हते. मुथियानचा मोबाईल नंबर मिळाला होता. त्याला त्यांनी सहज शोधून काढले; परंतु मुथियानला लगेच अटक केली, तर सुराणा सापडणार नाही, हा धोका लक्षात घेऊन तीन दिवस त्याच्यावर पाळत ठेवून पोलीस सुराणाचा शोध घेत होते. सुराणाने बदललेला मोबाईल नंबर मिळविण्यात मुंबईतील सायबरतज्ज्ञांना यश आले. त्यानंतर त्यांनी वेळोवळी पुरविलेल्या माहितीनंतर दोन्ही आरोपींना एमआयडीसी चिकलठाणा परिसरातून पोलिसांनी उचलले .
गुन्हा औरंगाबादेत वर्ग करण्यासाठी
नाना युक्ती आणि प्रभावाचा वापर
मुंबईतील गुन्हा औरंगाबादेत वर्ग करावा, यासाठी आरोपींनी पोलीस दलातील ओळखीच्या काही उच्च पदस्थ अधिकाऱ्यांना हाताशी धरून प्रयत्न केले होते. पोलीस महासंचालक कार्यालयापर्यंत याविषयी पत्रव्यवहार झाला होता. विविध युक्त्या आणि प्रभाव वापरण्याचा प्रयत्न त्यांनी केला. मात्र, हे सर्व प्रयत्न मुंबई पोलिसांनी हाणून पाडले.
स्थानिक पोलिसांची नाही घेतली मदत
मुंबई आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी तीन दिवसांपासून शहरात होते. आरोपींच्या अटकेसाठी मुंबई पोलिसांनी शहर पोलिसांची मदत घेतली नाही. एवढेच नव्हे तर तीन दिवसांपासून उपायुक्त दर्जाचा अधिकारी आणि अन्य अधिकारी, कर्मचारी औरंगाबादेत आल्याचे त्यांनी शहर पोलिसांपासून लपविल्याचे सूत्रांनी सांगितले.
एमआयडीसी सिडको ठाण्यात नोंद
दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन मुंबईला नेत असल्याची नोंद एमआयडीसी सिडको ठाण्यात केली. त्यानंतर आरोपींना सोबत घेऊन पोलीस अधिकारी, कर्मचारी मुंबईला रवाना झाले.

Web Title:  Builder's way of being a secret mobile number

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.