सेनेकडून पुन्हा बांधकाममंत्री लक्ष्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 12:54 AM2017-11-21T00:54:02+5:302017-11-21T00:54:48+5:30
जिल्ह्यातून बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील हे लक्ष्य होत असून, मागील काही दिवसांत त्यांना लक्ष्य करणा-या तीन घटना घडल्या आहेत. आ. हर्षवर्धन जाधव यांनी बांधकाम विभाग कन्नडमधील रस्ते करीत नसल्याचा आरोप केल्यानंतर सोमवारी राज्यमार्ग, जिल्हाप्रमुख मार्ग खड्डेमुक्त करण्याच्या मागणीसाठी कोकणवाडी ते अधीक्षक अभियंता कार्यालयापर्यंत निदर्शनांऐवजी छोटेखानी मोर्चा काढण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : जिल्ह्यातून बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील हे लक्ष्य होत असून, मागील काही दिवसांत त्यांना लक्ष्य करणा-या तीन घटना घडल्या आहेत. आ. हर्षवर्धन जाधव यांनी बांधकाम विभाग कन्नडमधील रस्ते करीत नसल्याचा आरोप केल्यानंतर सोमवारी राज्यमार्ग, जिल्हाप्रमुख मार्ग खड्डेमुक्त करण्याच्या मागणीसाठी कोकणवाडी ते अधीक्षक अभियंता कार्यालयापर्यंत निदर्शनांऐवजी छोटेखानी मोर्चा काढण्यात आला. याव्यतिरिक्त आ. प्रशांत बंब यांनीदेखील बांधकाम विभागाच्या विरोधात मध्यंतरी एक पत्र काढले होते. या सगळ्या घटनांचा आढावा घेतल्यास बांधकाममंत्री लक्ष्य होत असल्याचे दिसते.
महापौर नंदकुमार घोडेले, जि.प.अध्यक्षा देवयानी डोणगावकर, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, महानगर प्रमुख प्रदीप जैस्वाल, शहर प्रमुख बाळासाहेब थोरात, विश्वनाथ स्वामी, विजय वाघचौरे, अनिल पोलकर, सुशील खेडकर, गोपाल कुलकर्णी, राजेंद्र जंजाळ, विकास जैन, विजय सुबूकडे, रंजना कुलकर्णी यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या मोर्चात बांधकाम मंत्र्यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण यांना निवेदन देऊन जिल्ह्यातील राज्य व प्रमुख मार्ग खड्डेमुक्त करण्याची मागणी करण्यात आली.