‘जात, धर्मविरहित समाज उभा करणे काळाची गरज’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:05 AM2021-02-25T04:05:51+5:302021-02-25T04:05:51+5:30
वजनापूर येथे शिवजयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात कुऱ्हाडे बोलत होते. पुढे बोलताना कुऱ्हाडे म्हणाले की, शेती व्यवसायाला प्राध्यान्य दिले. त्यामुळेच एकाही ...
वजनापूर येथे शिवजयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात कुऱ्हाडे बोलत होते. पुढे बोलताना कुऱ्हाडे म्हणाले की, शेती व्यवसायाला प्राध्यान्य दिले. त्यामुळेच एकाही शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचे उदाहरण दिसून येत नाही. आपल्या राज्यातील सर्व जाती-धर्माच्या लोकांना 'मावळा' नावाने संघटित करून महाराजांनी रयतेचे राज्य उभे केले. दुर्दैवाने आजचे सर्वच पक्षांचे राजकारणी महाराजांच्या नावाचा जाती-धर्मासाठी गैरवापर करतात. त्यामुळे तरुणांनी महाराजांचा इतिहास अंगीकृत करून जात-धर्मविरहित नवसमाज उभा करणे ही काळाची गरज आहे.
यावेळी शिवसेनेचे प्रशांत बनसोड, राष्ट्रवादीचे विश्वजित चव्हाण, माजी जि. प. सभापती संतोष जाधव, शिवसंग्रामचे किशोर चव्हाण, पोपटराव चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. गजानन भोसले यांनी केले तर प्रास्ताविक किशोर चव्हाण यांनी केले.