पायात घुंगरू बांधले, आता नाचावे तर लागेलच..!

By Admin | Published: August 26, 2015 11:53 PM2015-08-26T23:53:22+5:302015-08-26T23:53:22+5:30

गजानन वानखडे , जालना पायात घुंगरु बांधले आहेत, आता नाचावे तर लागेलच, असे उद्गार पिंपरी-चिंचवड येथे होणाऱ्या ८९ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदाचे उमेदवार कवी

Bungu built on the leg, now you have to dance ..! | पायात घुंगरू बांधले, आता नाचावे तर लागेलच..!

पायात घुंगरू बांधले, आता नाचावे तर लागेलच..!

googlenewsNext


गजानन वानखडे , जालना
पायात घुंगरु बांधले आहेत, आता नाचावे तर लागेलच, असे उद्गार पिंपरी-चिंचवड येथे होणाऱ्या ८९ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदाचे उमेदवार कवी विठ्ठल वाघ यांनी लोकमतला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केले.
कवीवर्य विठ्ठल वाघ यांनी कवी जयराम खेडेकर यांच्या उर्मीच्या कार्यालयास सोमवारी भेट दिली. साहित्य संमेलनाचे आपण अध्यक्ष व्हावे, अशी मित्रमंडळीनी आग्रह केल्यानेच आपण अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे वाघ म्हणाले. यापूर्वी नाशिक येथे झालेल्या संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी माझे मित्र दिवंगत केशव मेश्राम यांच्यासाठी माघार घेतली होती. परंतु ज्या क्षेत्रात आपण एवढ्या वर्षांपासून काम करत आहोत. त्यात काही करण्यासाठी आपण का मागे राहावे, असेही मला वाटते. एक व्यासपीठ मिळवून नव्या पिढीशी त्या निमित्ताने संवाद साधता येणार असल्याने आपल्याला आनंद आहे. ना नफा ना तोटा तत्वावर आपले विचार वाचकांपर्यंत पोहोचविण्यास उत्सूक असल्याचे वाघ म्हणाले.
पुरोगामी समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात दाभोलकर, पानसरेंची हत्या होते. त्यामुळे एकाअर्थी धर्म विवेकाचा मारेकरी ठरतो. अंधश्रध्देचा निर्माता ठरत आहेत. त्यामुळे नव्या पिढीने अशा अंधश्रध्देपासून दूर राहावे, असे आवाहन त्यांनी केले.
ते म्हणतात
सोन्याची असते व्दारका पोथ्या पुराने सांगत असतात.
ऐकणाऱ्याच्या घरात मात्र लाकडाचेही खांब नसतात.
पुराणातली वांगी चिरून भाजी कधी शिजत नाही.
वरूणाचा धावा करून धरती कधी विझत नाही.
कथा कीर्र्तनातून कदा अमृताची ओतता साय.
घोटभर पाण्यासाठी वणवण भटके माझी माय.
अमृताचे खरे नाही. सत्य फक्त पाणी आहे.
एवढे ज्याला कळले. तोच वैदात्याहून ज्ञानी आहे.
असे मत व्यक्त केले. वाघ यांनी युवकांसाठी प्रेरणादायी कवीता म्हटली. महाराष्ट्र साहित्य आणि संस्कृती मंडळावर काम करत असताना लोकबोलीचे जतन व्हावे, या हेतूने तीन कोष तयार केले. एक वऱ्हाड मराठी बोलीचा शब्दकोष, यात वीस हजार शब्द आहेत, दुसरे मराठी म्हणीचा शब्दकोश १४ हजार म्हणी, वऱ्हाडी बोलीचा वाक्प्रचार कोष, असे तयार केले आहेत. फुले, शाहू आंबेडकर, संत तुकाराम, संत चोखामेळा आदी मंडळीनी जे आपल्या साहित्यातून सतत इतरांना जगण्याची उमेद दिली. त्यांच्यासारखे कार्य करण्याची गरज आहे. समाजातील विषमता दूर करण्यासाठी लेखक कविंनी आपली लेखनी झिजवावी.
अखिल भारतीय विश्व साहित्य संमेलन परदेशात होतात याबद्दल वाघ म्हणतात की, जर जगभर मराठी जात असेल तर त्याला काय हरकत आहे. पण त्याची फलनिष्पत्ती काय. कोणतेही संमेलन घेण्याचा एक विचार असतो. तो साध्य होतो काय, तो विचार पुढे जात आहे काय, याची तपासणी होणे गरजेचे आहे. जगभरात मराठी पोहचविण्याचे काम विश्व मराठी साहित्य संमेलन करत आहे. परंतु ते कौटुंबिक साहित्य होऊ नये ही अपेक्षा आहे.

Web Title: Bungu built on the leg, now you have to dance ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.