अवैध नळजोडणी घेणाऱ्यांवर उगारला कारवाईचा बडगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2019 05:30 PM2019-01-13T17:30:17+5:302019-01-13T17:30:35+5:30

वाळूज येथे मुख्य जलवाहिनीवरून अनधिकृतपणे नळजोडणी घेणाºयाविरुद्ध ग्रामपंचायत प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे.

The burden of the action taken against those who took an illegal nod | अवैध नळजोडणी घेणाऱ्यांवर उगारला कारवाईचा बडगा

अवैध नळजोडणी घेणाऱ्यांवर उगारला कारवाईचा बडगा

googlenewsNext

वाळूज महानगर : वाळूज येथे मुख्य जलवाहिनीवरून अनधिकृतपणे नळजोडणी घेणाºयाविरुद्ध ग्रामपंचायत प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. वाळूजमध्ये शनिवारी पोलीस बंदोबस्तात राबविलेल्या मोहिमेत १५ नळ कनेक्शन कापण्यात आले.


वाळूज गावात मुबलक पाणी असूनही अनेक भागांत कमी-अधिक दाबाने व आठ ते दहा दिवसांआड पाणीपुरवठा केला जात आहे. यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. सार्वजनिक विहीर व एमआयडीसीकडून मुबलक पाणीपुरवठा होत असतानाही पाणी पुरवठ्याचे नियोजन कोलमडत आहे. ऐन हिवाळ्यात गावातील नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असल्याने नागरिकांत असंतोषाचे वातावरण आहे. विशेष म्हणजे मुख्य जलवाहिनीतून अनेक नागरिक व व्यावसायिकांनी अनधिकृतपणे नळ जोडणी घेतलेली आहे. ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा कर्मचाºयांच्या मदतीने अनेकांनी अवैध नळजोडणी घेतल्याने गावात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. गत दीड-दोन वर्षांपूर्वीही ग्रामपंचायतीने मुख्य जलवाहिनीवरून नळजोडणी घेणाºयाविरुद्ध कारवाईचा बडगा उगारत अनेक व्यावसायिक व राजकीय पदाधिकाºयांचे नळ कनेक्शन कापले होते.

मात्र, कालांतराने पुन्हा विविध व्यावसायिकांनी ग्रामपंचायत पदाधिकारी व कर्मचाºयांशी हातमिळवणी करून अनधिकृतपणे नळजोडणी घेतल्याने गावातील पाणीपुरवठ्याचे नियोजन ढासळले आहे. सुरळीत पाणीपुरवठा करण्यासंदर्भात ग्रामपंचायतीकडे सतत तक्रारी करूनही याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने गावातील नागरिकांना कृत्रिम पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. ग्रामपंचायतीच्या वतीने संबंधिताविरुद्ध कारवाई करण्याचा निर्णय घेतला. 


रविवारीही मोहीम राबविणार
वाळूज गावातील बाजारगल्ली, रामराई रोड, वाळूजगाव आदी भागातून गेलेल्या मुख्य जलवाहिनीवर अनेकांनी अनधिकृत नळ कनेक्शन घेतले होते. शनिवारी पोलीस बंदोबस्तात सरपंच पपीन माने, ग्रामविकास अधिकारी एस. सी. लव्हाळे, लिपिक ताजू मुल्ला, कैलास धुमाळ, शेख असलम, राजाराम जमधडे, तुकाराम मिसाळ, अंकुश वाघचौरे, पांडुरंग आगळे, देवचंद भुजंग, संजय खंडागळे आदींनी मोहीम राबवून पहिल्याच दिवशी मुख्य जलवाहिनीवरील १५ नळ कनेक्शन कापले. रविवारीही ही मोहीम सुरूराहणार असल्याचे ग्रामपंचायतीच्या वतीने सांगण्यात आले.

Web Title: The burden of the action taken against those who took an illegal nod

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.