खासगी रुग्णालयांवर कोरोना रुग्णांचा भार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:04 AM2021-03-22T04:04:16+5:302021-03-22T04:04:16+5:30
औरंगाबाद : शहरात कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढत आहे. परिणामी, खासगी रुग्णालयांवर कोरोना रुग्णांचा भार वाढत आहे. बहुतांश खासगी रुग्णालयांतील ...
औरंगाबाद : शहरात कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढत आहे. परिणामी, खासगी रुग्णालयांवर कोरोना रुग्णांचा भार वाढत आहे. बहुतांश खासगी रुग्णालयांतील खाटा फुल्ल झाल्या आहेत. अशा अवस्थेत तारेवरची कसरत करून रुग्णसेवा दिली जात आहे. मात्र, एकीकडे रोज नव्या रुग्णांची भर पडत आहे, तर दुसरीकडे कोरोना रुग्णांसाठी खाटा वाढविण्याचे आव्हान खासगी रुग्णालयांपुढे उभे राहिले आहे.
गतवर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला, तेव्हा जेवढे खासगी रुग्णालय, खाटा उपलब्ध होत्या, त्यापेक्षा अधिक रुग्णालय सध्या कोरोना रुग्णांवर उपचार देत आहे. खाटांची संख्याही वाढली आहे, तरीही रुग्णांपुढे ही खासगी रुग्णालयांच्या खाटा अपुऱ्या पडत आहेत. त्यामुळे खाटा वाढविण्याचे नियोजन रुग्णालयांकडून केले जात आहे, परंतु मनुष्यबळाच्या अडचणीला सामोरे जावे लागत आहे, शिवाय इतर आजारांची रुग्णसेवाही सुरळीत ठेवावी लागत आहे. अशा परिस्थित खासगी रुग्णालयांना खाटा वाढविण्यासाठी अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
खाटा वाढविण्यास अडचणी
गतवर्षीच्या तुलनेत यावेळी खासगी रुग्णालयांवर अधिक भार आला आहे. त्यामुळे पूर्वीपेक्षा खासगी रुग्णालयांची क्षमता अधिक वाढली आहे. रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयांची जबाबदारी वाढली आहे, परंतु रुग्णसंख्येच्या तुलनेत खाटा वाढविण्यास अडचण येत आहे. जीवदायी योजना, कॅशलेश, विमा यामध्यातून खासगी रुग्णालयांत उपचार घेण्यासाठी येणाऱ्यांची संख्या अधिक आहे.
- डाॅ. हिमांशू गुप्ता, अध्यक्ष, मराठवाडा हाॅस्पिटल असोसिएशन
खासगी रुग्णालयांतील कोरोना रुग्णांची स्थिती (रविवार सायंकाळपर्यंत)
रुग्णालय खाटांची क्षमता दाखल रुग्ण
१) शंकर चेस्ट हाॅस्पिटल २० २०
२) गजानन हाॅस्पिटल ४६ ४६
३) साई मेडिसिटी हाॅस्पिटल ३३ ३३
४) श्रद्धा हाॅस्पिटल २८ २७
५) लाइफ हाॅस्पिटल ४२ ४१
६) आशिष हाॅस्पिटल २५ २५
७) लाइफलाइन हाॅस्पिटल ६० ५६
८)धनवई हाॅस्पिटल १६ १६
९) मेडिकव्हर हाॅस्पिटल ९० ९०
१०) जे.जे. प्लस हाॅस्पिटल ५० ५०
११) कृष्णा हाॅस्पिटल ८६ ८६
१२) अंजता हाॅस्पिटल ४१ २७
१३) माणिक हाॅस्पिटल ८५ ८५
१४) एमआयटी हाॅस्पिटल ४४ ३१
१५) ओरिऑन सिटी केअर हाॅस्पिटल ४३ ४३
१६) अपेक्स हाॅस्पिटल ६५ ६१
१७) एशियन हाॅस्पिटल ७१ ७१
१८) सिग्मा हाॅस्पिटल ९३ ९३
१९) बजाज हाॅस्पिटल ९० ८४
२०) धूत हाॅस्पिटल १३२ १३२
२१) सुमनांजली हाॅस्पिटल ३० ३०
२२) वी केअर हाॅस्पिटल ४० ४०