वाळूज महानगरात चोऱ्यांचे सत्र थांबेना!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2019 10:21 PM2019-07-26T22:21:41+5:302019-07-26T22:21:50+5:30
वाळूज महानगरात चोरीच्या घटनांचे सत्र सुरुच आहे.
वाळूज महानगर : वाळूज महानगरात चोरीच्या घटनांचे सत्र सुरुच आहे. चोरट्यांनी एका कंपनीच्या गोदामाचे कुलूप उघडून जवळपास पाऊण लाखाचा मुद्देमाल लंपास केला आहे. याप्रकरणी कंपनीच्या सुरक्षा रक्षकाविरुद्ध वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवप्रसाद झुंबरलाल जाजू (५९, रा. खिवंसरा पार्क, गारखेडा औरंगाबाद) यांच्या वाळूज एमआयडीसी परिसरात दोन कपंन्या आहेत. या कंपन्यांत होेणारे उत्पादन पवन इंटरनॅशलन कंपनीच्या गोदामात ठेवण्यात येते.
याच्या सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षक म्हणून कारभारी लिंगायत (७०) यांची नेमणूक केली असून, त्यांना राहण्यासाठी कंपनीत एक खोलीही देण्यात आली आहे. लिंगायत यांच्या सोबत त्यांची मुलगी जिजाबाई राऊत ही रहाते.
जाजू यांनी १२ जुलै रोजी गोदामात ठेवलेल्या मालाची पाहणी केली असता त्यात ७२ हजार ५०० रुपये किंमतीचा माल कमी दिसून आला. सुरक्षा रक्षक लिंगायत यांनीच बनावट चावीद्वारे गोदामातील मालाची चोरी केल्याचे जाजू यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
या प्रकरणी पोलीस ठाण्यात सुरक्षा रक्षक कारभारी लिंगायत याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.