सिल्लोडमध्ये घरफोडी; लाखाचा ऐवज लंपास

By Admin | Published: November 14, 2015 12:38 AM2015-11-14T00:38:59+5:302015-11-14T00:53:08+5:30

सिल्लोड : शहरात दिवाळीला बाहेरगावी गेलेल्या दोन जणांच्या घराचा कडीकोयंडा, कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी ४० हजार रुपये रोख व सोन्या-चांदीचे दागिने

Burglary in Sillod; Lakhas of Lakhas | सिल्लोडमध्ये घरफोडी; लाखाचा ऐवज लंपास

सिल्लोडमध्ये घरफोडी; लाखाचा ऐवज लंपास

googlenewsNext


सिल्लोड : शहरात दिवाळीला बाहेरगावी गेलेल्या दोन जणांच्या घराचा कडीकोयंडा, कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी ४० हजार रुपये रोख व सोन्या-चांदीचे दागिने टीव्ही असा जवळपास एक लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना शुक्रवारी पहाटे घडली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
चरणसिंग प्रेमसिंग बारवाल, वय ३५ वर्ष,े रा.आव्हाना, ह.मु. शिवाजीनगर, आंबेडकर चौक सिल्लोड हे गुरुवारी दुपारी घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले असता अज्ञात चोरट्यांनी शुक्रवारी पहाटे घराचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश करून घरातील टीव्ही, सेटटॉप बॉक्स, सोन्या-चांदीचे दागिने असा ६५ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केला.
त्याच प्रमाणे सिल्लोड शहरातील त्यांच्या शेजारी राहणाारे नीलेश गणेश लोखंडे यांच्या घरातून अज्ञात चोरट्यांनी एक सॅमसंग कंपनीचा मोबाईल व ४० हजार रुपये रोख पळविले. दोघांचा मिळून एक लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. या दोघांनी दिलेल्या फिर्यादीवरून सिल्लोड शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक मनोहर वानखेडे करीत आहेत.

Web Title: Burglary in Sillod; Lakhas of Lakhas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.