दीड एकरवरील ऊस जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2019 10:17 PM2019-03-29T22:17:00+5:302019-03-29T22:17:09+5:30
जोगेश्वरी शिवारात शुक्रवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास अचानक आग लागून जवळपास दीड एकर ऊस जळाला आही.
वाळूज महानगर : जोगेश्वरी शिवारात शुक्रवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास अचानक आग लागून जवळपास दीड एकर ऊस जळाला आही. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
कडुबा नाथु सोनवणे यांची जोगेश्वरी शिवारात गट नंबर ६० मध्ये जमीन आहे. यात सोनवणे यांनी दीड एकरात ऊसाचे उत्पादन घेतले आहे. शुक्रवारी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास वीज प्रवाह असलेल्या तारांचे घर्षण होऊन ठिणग्या उडाल्या. त्या उसावर पडून लागली. काहीवेळातच आगीने रौद्र रुप धारण केले. कडक उन व वाऱ्यामुळे आग आटोक्यात आणण्यात शेतकऱ्यांची धावपळ सुरुच होती.
काही वेळानंतर वाळूज अग्नीशामक विभागाच्या जवानांनी घटनास्थळ गाठुन पाण्याचा मारा करीत दीड तासानंतर आग विझविण्यात यश आले. यात दीड एकर उस जळाला असून अंदाजे ३ लाख रुपयाचे नुकसान झाले आहे. यावेळी तलाठी राहुल वंजारी यांनी नुकसानीचा पंचनामा केला.