बस चालकाचा ओव्हरटेकचा प्रयत्न, ट्रिपलसीट मित्रांचा तोल गेला, एकाचा जागीच मृत्यू

By सुमित डोळे | Published: March 20, 2024 11:39 AM2024-03-20T11:39:01+5:302024-03-20T11:39:52+5:30

ट्रिपलसीट दुचाकीस्वारांच्या अपघाताची दोन महिन्यांत तिसरी घटना, शिक्षक दाम्पत्याने एकुलता एक मुलगा गमावला.

Bus driver attempts to overtake, triple seat friends lose balance, one dies on the spot | बस चालकाचा ओव्हरटेकचा प्रयत्न, ट्रिपलसीट मित्रांचा तोल गेला, एकाचा जागीच मृत्यू

बस चालकाचा ओव्हरटेकचा प्रयत्न, ट्रिपलसीट मित्रांचा तोल गेला, एकाचा जागीच मृत्यू

छत्रपती संभाजीनगर : सलूनमध्ये केस कापून घरी परतणाऱ्या ट्रिपलसीट मित्रांच्या मोपेड दुचाकीला खासगी बस चालकाने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. यामुळे दुचाकीचा तोल जाऊन तिन्ही मित्र रस्त्यावर कोसळले. यात दोन मित्र किरकोळ जखमी झाले. मात्र, शेवटी बसलेल्या यश नरेश खडसे (२३) डोक्यावर पडल्याने जागीच मृत्यू झाला. सोमवारी रात्री ११ वाजता बीडबायपासवर हिवाळे लॉन्ससमोर हा अपघात घडला.

यश आईवडील, मोठ्या बहिणीसह देवळाई परिसरातील स्वर्ग रेसिडेन्सीमध्ये राहत होता. सोमवारी रात्री ९ वाजता यश अन्य दोन मित्रांसह तो मोपेड दुचाकीवरून ते रेणुका माता मंदिर कमानीजवळील सलूनमध्ये केस कापण्यासाठी गेले होते. ११ वाजेपर्यंत सलूनमध्ये थांबल्यानंतर तिघेही पुन्हा बीडबायपासमार्गे देवळाई चौकाच्या दिशेने जात होते. मात्र, हिवाळे लॉन्स व न्यू सुखसागर हॉटेलच्या दरम्यान डाव्या बाजूने जात असताना त्यांना जगदंबा ट्रॅव्हल्स कंपनीच्या बस चालकाने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. यात मुलांच्या दुचाकीचा तोल जाऊन रस्त्यावर कोसळले, अन्य मित्र किरकोळ जखमी झाले. मात्र, सर्वात शेवटी बसलेला यश थेट मागे डोक्यावर कोसळल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती कळताच, सातारा पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक नंदकुमार भंडारी, विष्णू जगदाळे यांनी धाव घेतली.

सरकारी अधिकारी बनायचे होते
यशला एक माेठी बहीण असून, आई-वडिलांना एकुलता एक मुलगा होता. त्याचे आईवडील दोघेही शिक्षक आहेत. अभियांत्रिकी उत्तीर्ण झाल्यानंतर शासकीय सेवेत अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणारा यश स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. त्याचे अन्य दोन मित्रही अभियांत्रिकीचे शिक्षण घेतात. सोमवारी रात्री ९ वाजेपर्यंत कुटुंबासोबत वेळ घालविलेल्या यशच्या कुटुंबावर मात्र क्षणात दु:खाचा डोंगर कोसळला.

Web Title: Bus driver attempts to overtake, triple seat friends lose balance, one dies on the spot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.