सिडको बसस्थानकातील बससेवा सुरळीत, आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीच्या नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2021 12:21 PM2021-10-30T12:21:55+5:302021-10-30T12:22:23+5:30

शनिवारी सकाळी सिडको बसस्थानक आगारातील अनेक चालक वाहक कर्तव्यावर हजर झाले.

Bus service at Cidco bus stand smooth, termination notice to agitating ST employees | सिडको बसस्थानकातील बससेवा सुरळीत, आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीच्या नोटिसा

सिडको बसस्थानकातील बससेवा सुरळीत, आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीच्या नोटिसा

googlenewsNext

औरंगाबाद : आंदोलन करून 'एसटी'चा चक्का जाम करणाऱ्या सिडको बसस्थानकातील कर्मचाऱ्यांना एसटी महामंडळाकडून सेवा समाप्तीचा नोटिसा बजावण्यात आल्या. त्यामुळे आंदोलनात फूट पडली.

शनिवारी सकाळी सिडको बसस्थानक आगारातील अनेक चालक वाहक कर्तव्यावर हजर झाले. त्यामुळे दोन दिवसानंतर सिडको बसस्थानकातून एसटी बाहेर पडायला सुरुवात झाली. काही कर्मचारी अद्यापही आंदोलनावर ठाम असून आगाराच्या प्रवेशद्वारावर ते बसून आहेत.

एस. टी. महामंडळचे विभागीय वाहतूक अधिकारी अमोल अहिरे, सिडको बसस्थानक आगाराचे व्यवस्थापक लक्ष्मण लोखंडे यांनी आगारात धाव घेऊन कर्तव्यावर रवाना करण्यासाठी परिश्रम घेतले.

Web Title: Bus service at Cidco bus stand smooth, termination notice to agitating ST employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.