अनेक मार्गांवर बस धावायला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:05 AM2021-06-16T04:05:52+5:302021-06-16T04:05:52+5:30
-- औरंगाबाद : ब्रेक द चेननंतर निर्बंध शिथिल झाल्याने एसटी बससेवा सुरू झाली. बससेवा हळूहळू पूर्ववत करण्यात येत आहे. ...
--
औरंगाबाद : ब्रेक द चेननंतर निर्बंध शिथिल झाल्याने एसटी बससेवा सुरू झाली. बससेवा हळूहळू पूर्ववत करण्यात येत आहे. सोमवारपासून औरंगाबाद ते मुंबई व बोरवली, नागपूर, अकोला, नांदेड मार्गावर शिवशाहीसह साध्या बसगाड्या सुरू करण्यात आल्या आहेत.
कोरोनाच्या निर्बंधामुळे एसटी बस गेल्या दोन महिन्यापासून एसटीची सेवा ठप्प झाली होती. आता निर्बंध उठवल्यानंतर हळूहळू एसटीची सेवा पूर्वपदावर येत आहे. मध्यवर्ती बसस्थानकातून पुन्हा मुंबईसाठी वातानुकूलित शिवशाही बस सुरू करण्यात आली आहे, तर सिडको बसस्थानातून नागपूर ६, यवतमाळ २, पूसद १, अकोला ५, नांदेड ११, बुलडाणा १, तुळजापूर १, सोलापूर २, लातूर ६ बसची सेवा सुरू करण्यात आली आहे. कोरोनाचे नियम पाळून ही बससेवा चालवल्या जात आहे. प्रत्येक फेरीनंतर बस सॅनिटाइज केली जात आहे, अशी माहिती सिडकोचे आगार व्यवस्थापक लक्ष्मण लोखंडे यांनी दिली.