बसची ट्रॅक्टरला धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2017 12:24 AM2017-11-07T00:24:36+5:302017-11-07T00:24:43+5:30
एस.टी. महामंडळाच्या बसने ट्रॅक्टरला पाठीमागून जोराची धडक दिल्याने ट्रॅक्टरमधील ५ व बसमधील ५७ प्रवासी जखमी झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अजिंठा : एस.टी. महामंडळाच्या बसने ट्रॅक्टरला पाठीमागून जोराची धडक दिल्याने ट्रॅक्टरमधील ५ व बसमधील ५७ प्रवासी जखमी झाले. हा भीषण अपघात सोमवारी रात्री आठ वाजता औरंगाबाद -जळगाव महामार्गावरील अजिंठा येथे वाघूर नदीच्या पुलाजवळ घडला. सर्व जखमींवर अजिंठा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करुन नंतर पुढील उपचारासाठी औरंगाबाद, सिल्लोड व जळगाव येथे रवाना करण्यात आले.
औरंगाबादकडून जळगावकडे जाणाºया बसने (क्र. एमएच-२०-बीएल-२८९३) बाळापूरकडून मका घेऊन अजिंठ्याकडे येणाºया ट्रॅक्टरला (क्र. एमएच -३४-एल-६८७५) पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात ट्रॅक्टरचालक दिलीप सातफळे हा स्टेअरिगंमध्ये दबून तर टॅÑक्टरमधील एकबाल खान महंमदखा, नसीबखा सलीमखा, शकीलखा हे ट्रॅक्टरखाली फेकल्या गेल्याने गंभीर जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच फहीम मेकॅनिक, विक्की सनान्से, अय्याज खान, फैजल मालिक, जहागीरखॉ, मेघराज चौडिये, अब्दुल वहाब, फकीरा खान, सूरज आगवाल, विजय बावस्कर, राजू पवार, सुनील काळे, मंगेश सनान्से आदींनी धाव घेऊन जखमींना अजिंठा येथील रुग्णालयात दाखल केले. डॉ. गुप्ता, डॉ. नसीर, डॉ. सोळुंके, डॉ. खान, डॉ. गणेश दसरे, डॉ. शशिकांत जोशी यांनी तातडीने जखमींवर उपचारा करुन नंतर जळगाव, औरंगाबाद, सिल्लोड येथे अधिक उपचारासाठी पाठविले.