व्यापारी, प्रशासन परळीत समोरासमोर
By Admin | Published: August 26, 2015 11:45 PM2015-08-26T23:45:10+5:302015-08-26T23:45:10+5:30
परळी : शहरातील मोेंढा मार्केट भागात बुधवारी सकाळी कपड्याच्या दुकानासमोरील पायऱ्याच्या फरशा नगर परिषदेच्या जेसीबीच्या सहाय्याने काढल्याच्या
परळी : शहरातील मोेंढा मार्केट भागात बुधवारी सकाळी कपड्याच्या दुकानासमोरील पायऱ्याच्या फरशा नगर परिषदेच्या जेसीबीच्या सहाय्याने काढल्याच्या कारणावरून व्यापाऱ्यांमध्ये गोंधळ उडाला व व्यापाऱ्यांनी सम, विषम तारखेस पार्कींग व्यवस्था करण्याला कडाडून विरोध करीत दुकाने बंद ठेवली.
राणी लक्ष्मीबाई टॉवर ते एकमिनार चौक या दरम्यान पी-१, पी-२ ची अंमलबजावणी करण्याचा निर्धार न.प. व पोलीस प्रशासनाने केला. त्या अनुषंगाने बुधवारी मोंढा भागातील, शंकुरवार यांचे कृष्णा रेडीमेड व कृष्णा टेक्सटाईल्स, काकडे यांचे रामानंद ड्रेसेस या दुकाना जवळील पायऱ्याच्या फरशा काढण्यात आल्या त्यामुळे या ठिकाणी कपड्याचे व्यापारी जमले. लागलीच इतर व्यापारी ही या ठिकाणी धावून आले व पी-१, पी-२ ची अंमलबजावणी करण्यास विरोध दर्शविला. शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक सोपानराव निघोट यांनी या ठिकाणी व्यापाऱ्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, व्यापारी काबरा व निरीक्षक निघोट यांच्यात शाब्दीक चकामक झाली. त्यामुळे वातावरण संतप्त झाले व मोंढा ते टॉवर या भागातील व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली. नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांनी व्यापारी व पोलीस प्रशासनाची बैठक घेतली व त्यामध्ये शुक्रवारी पी-१, पी-२ च्या संदर्भात निर्णय घेण्याचे ठरविण्यात आले. या नंतर संतप्त व्यापारी शांत झाले.
दरम्यान, व्यापाऱ्यांशी बोलणी सुरू असून, तोडगा काढण्यात येईल, असे निरीक्षक सोपानराव निघोट यांनी सांगितले. (वार्ताहर)