बनावट पास बनविणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 12:55 AM2018-04-21T00:55:06+5:302018-04-21T00:55:29+5:30
एस.टी. बसमध्ये ‘वनफोर’ तिकीट सवलत घेण्यासाठी अपंगांचे बनावट पास तयार करून देणाºया टोळीचा शुक्रवारी पोलिसांनी पर्दाफाश केला. यात सिल्लोड येथील दोन एजंट, शेवगाव, जि. अहमदनगर येथील २ मुख्य आरोपी, अशा चार जणांना पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्या ताब्यातून १०८ बनावट कार्ड, ७८ कोरे पास, बनावट रबरी शिक्के, प्रमाणपत्र जप्त करण्यात आले. शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी सिल्लोड शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
सिल्लोड : एस.टी. बसमध्ये ‘वनफोर’ तिकीट सवलत घेण्यासाठी अपंगांचे बनावट पास तयार करून देणाºया टोळीचा शुक्रवारी पोलिसांनी पर्दाफाश केला. यात सिल्लोड येथील दोन एजंट, शेवगाव, जि. अहमदनगर येथील २ मुख्य आरोपी, अशा चार जणांना पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्या ताब्यातून १०८ बनावट कार्ड, ७८ कोरे पास, बनावट रबरी शिक्के, प्रमाणपत्र जप्त करण्यात आले. शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी सिल्लोड शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणातील एजंट शेख नदीम शेख गुलाम नबी, किशोर पंढरीनाथ नागापुरे (रा. सिल्लोड) यांना पोलिसांनी सिल्लोड बसस्थानकावर अटक केली, तर या टोळीचे मुख्य सूत्रधार बनावट ओळखपत्र तयार करून देणारे बाबमियाँ हसन सय्यद, परमेश्वर भगवान बढे (रा. कांबी बोधेगाव, ता. शेवगाव, जि. अहमदनगर) यांना पोलिसांनी पैठण येथून अटक केली. यातील एक आरोपी फरार असून, त्याचे नाव सुसर पाटील (रा. भोकरदन) असे आहे. एसटी बसमध्ये भाड्यात सवलत मिळत असल्याने अशा बनावट ओळखपत्रांद्वारे आरोपी मोठी कमाई करीत आहेत. हे मोठे रॅकेट असून, तपासाअंती आणखी माहिती हाती येणार आहे. या कारवाईने सिल्लोड तालुक्यात खळबळ उडाली आहे.
४सिल्लोड बसस्थानक परिसरात काही जण लोकांकडून जादा पैसे घेऊन अपंगत्वाचे बनावट ओळखपत्र तयार करून देत आहेत, अशी माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी उपरोक्त दोन एजंटांची झडती घेतली असता त्यांच्याकडे ६ बनावट ओळखपत्र मिळाले.
४त्यांना विश्वासात घेऊन विचारले असता त्यांनी शेवगाव येथील दोघांनी बनावट ओळखपत्र बनवून दिल्याचे सांगितले. यावरून पोलिसांनी मुख्य सूत्रधारांना सापळा रचून पैठण येथून अटक केली. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग, पोलीस उपनिरीक्षक विवेक जाधव, सहायक फौजदार गफ्फार पठाण, गणेश मुळे, विठ्ठल राख, पोलीस नाईक शेख नदीम, संजय भोसले, विनोद तांगडे, ज्ञानेश्वर मेटे, सोनवणे यांनी केली.