नाफेडतर्फे ८०६ क्ंिवटल उडीद-मूग खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 12:33 AM2017-10-29T00:33:58+5:302017-10-29T00:34:12+5:30
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये २६ आॅक्टोबरपासून नाफेडकडून मूग-उडीद खरेदी करण्यात येत आहे. एकरी दीड क्विंटलप्रमाणे नाफेडतर्फे शेतीमाल खरेदी सुरू असून आतापर्यंत ८०६ क्विंटल मूग-उडीद खरेदी केल्याचे नाफेडकडून सांगण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये २६ आॅक्टोबरपासून नाफेडकडून मूग-उडीद खरेदी करण्यात येत आहे. एकरी दीड क्विंटलप्रमाणे नाफेडतर्फे शेतीमाल खरेदी सुरू असून आतापर्यंत ८०६ क्विंटल मूग-उडीद खरेदी केल्याचे नाफेडकडून सांगण्यात आले.
हिंगोली येथील नाफेड केंद्रावर शेतकºयांनी २५ आॅक्टोबरपासून उडीद-मूग खरेदीसाठी आणले होते. परंतु आणेवारीच्या निकषात शेतमाल विकण्यास शेतकºयांनी विरोध केल्याने खरेदी केंद्रावर गोंधळ झाला होता. परंतु दुसºया दिवशीपासून आणेवारीप्रमाणेच शेतकºयांकडील माल खरेदी करण्यात आला. २६ ते २८ आॅक्टोबरदरम्यान आतापर्यंत उडीद ६१३ तर मूग १९३ क्विंटल असा एकूण ८०६ क्विंटल माल नाफेडने खरेदी केला. मुगाला ५ हजार ५७५ रूपये व उडीदाला ५ हजार ४०० रूपयेप्रमाणे भाव मिळाला. शेतकºयांची गैरसोय टाळण्यासाठी तसेच मालाची खरेदी वेळेत व्हावी यासाठी टप्या-टप्याने शेतकºयांना नाफेडतर्फे एसएमएस पाठविले जात असल्याचे नाफेड केंद्राचे उमेश नागरे यांनी सांगितले. दररोज ५0 शेतकºयांनाच संदेश दिले जात आहेत.
अर्धे शेतकरी येतच नसल्याने ही संख्या वाढविण्याची गरज असून त्यामुळे मोजणी प्रक्रियेस थांबण्याची गरज राहणार नाही.