मुलाच्या उपचारासाठी जमीन विकत घ्या; पंतप्रधानांना पत्र !

By Admin | Published: January 17, 2017 10:45 PM2017-01-17T22:45:23+5:302017-01-17T22:48:52+5:30

अंबुलगा : मुलाच्या किडनीच्या आॅपरेशनसाठी विकायला काढलेली जमीन नोटाबंदीमुळे कोणीही घेत नसल्याने जमीन शासनानेच खरेदी करून पैसे द्यावेत़ यासाठी एका शेतकऱ्याने पंतप्रधानांना पत्र पाठवून विनंती केली आहे़

Buy land for child's treatment; Prime Minister's letter! | मुलाच्या उपचारासाठी जमीन विकत घ्या; पंतप्रधानांना पत्र !

मुलाच्या उपचारासाठी जमीन विकत घ्या; पंतप्रधानांना पत्र !

googlenewsNext

अंबुलगा : मुलाच्या किडनीच्या आॅपरेशनसाठी विकायला काढलेली जमीन नोटाबंदीमुळे कोणीही घेत नसल्याने जमीन शासनानेच खरेदी करून पैसे द्यावेत़ यासाठी एका शेतकऱ्याने पंतप्रधानांना पत्र पाठवून विनंती केली आहे़
निलंगा तालुक्यातील हाडगा येथील अल्पभुधारक शेतकरी माधव नरवटे यांचा २६ वर्षीय मुलगा ज्ञानेश्वरच्या गतवर्षी अचानक दोन्ही किडनी निकामी झाल्या. दोन एकर शेतीसह रोजंदारीवर चालणाऱ्या कुटुंबांवर मोठे संकट उभा टाकले. घरचा कर्ता मुलगा आजारी पडल्याने कुटुंब अस्वस्थ झाले़ पाहुणे व मित्रपरिवाराच्या मदतीने आतापर्यंत दवाखाना करण्यात आला. किडनी प्रत्यारोपना शिवाय दुसरा पर्याय नसल्याचे औरंगाबाद येथील डॉक्टरांनी सांगितले़ तात्काळ आईने किडनी देण्याचा निर्णय घेतला़ त्यासाठी जवळपास सात लाख रुपये खर्च लागणार असल्याने शेवटी वडील माधवराव यांनी आपली एक एकर जमीन विकण्यासाठी काढली़ परंतू, नोटबंदीमुळे कोणाकडेही मोठी रक्कम शिल्लक राहिली नाही़ त्यामुळे गेल्या दोन महीन्यापासून एकही व्यक्ती खरेदीसाठी पुढे आली नाही. नोटाबंदीचा मोठा फटका बसला दिवसेंदिवस ज्ञानेश्वरची प्रकृती खालावत चालल्याने शेवटी वडिलांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून आपली जमिन शासनानेच विकत घ्यावी व मुलाच्या आॅपरेशनसाठी पैसे द्यावेत अशी आर्त हाक दिली आहे.

Web Title: Buy land for child's treatment; Prime Minister's letter!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.