आंगणवाडीसाठी जादा दराने साहित्य खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 11:22 PM2019-05-21T23:22:51+5:302019-05-21T23:23:09+5:30
अंगणवाडी केंद्रासाठी विविध साहित्य जादा दराने करण्यात आल्याची तक्रार पंचायत समिती सदस्याने केली जिल्हा परिषद प्रशासनाकडे केली आहे.
वाळूज महानगर : अंगणवाडी केंद्रासाठी विविध साहित्य जादा दराने करण्यात आल्याची तक्रार पंचायत समिती सदस्याने केली जिल्हा परिषद प्रशासनाकडे केली आहे.
गंगापूरच्या दोन्ही बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी तक्रारीत करण्यात आली आहे. शासनाकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधींतर्गत काही अंगणवाड्यांना साहित्य खरेदीसाठी निधी उपलब्ध करुन दिला जात आहे. गंगापूर येथील एकात्मिक बाल विकास सेवा योजना १ व २ मध्ये ३ लाखांचा निधी देण्यात आला. प्रकल्प अधिकारी कोमल कोरे व निलेश राठोड यांनी नियमांचे उल्लंघन करुन साहित्य खरेदी केल्याचा आरोप गंगापूर पं. स. सदस्या पुष्पा दळवी यांनी केला आहे. यासंदर्भात दळवी यांनी मुख्यमंत्री, महिला व बालविकासचे प्रधान सचिव, जिल्हा परिषद, पंचायत समितीकडे तक्रारी केल्या आहेत.
गंगापूर तालुक्यात अंगणवाडीला लागणाºया साहित्य खरेदीत गैरव्यवहार झाल्याची तक्रार आली आहे. याची वित्त समितीमार्फत चौकशी केली जाईल. यात दोषी आढळून आल्यास संबंधित अधिकाºयांविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असे उपमुख्य-कार्यकारी अधिकारी प्रसाद मिरकले यांनी सांगितले.