आरक्षित प्लॉट खरेदी करायचायं? माहुरात या!

By Admin | Published: February 24, 2016 11:48 PM2016-02-24T23:48:34+5:302016-02-24T23:53:15+5:30

इलियास बावाणी, माहूर शहरातील अनेक महत्त्वाच्या जागांवर धनदांडग्यांनी अतिक्रमण केले असून उलटसुलट कागदपत्रे तयार करून वेळप्रसंगी न्यायालयात याच कागदपत्रांअधारे खटले लढवून घट्ट बस्तान बसविले़

Buy a reserved plot? The mahurat or! | आरक्षित प्लॉट खरेदी करायचायं? माहुरात या!

आरक्षित प्लॉट खरेदी करायचायं? माहुरात या!

googlenewsNext

इलियास बावाणी, माहूर
शहरातील अनेक महत्त्वाच्या जागांवर धनदांडग्यांनी अतिक्रमण केले असून उलटसुलट कागदपत्रे तयार करून वेळप्रसंगी न्यायालयात याच कागदपत्रांअधारे खटले लढवून घट्ट बस्तान बसविले़ नगरपंचायतला लागून असलेल्या मुख्य रस्त्यावरील जागा डीपी प्लॅनमध्ये आरक्षित असताना याचे पीआर कार्ड बनले कसे? असा सवाल माहूरकरांचा आहे.
माहूर शहर हे पौराणिक, ऐतिहासिक पर्यटनस्थळ असल्याने शासन देवस्थानासह भाविक पर्यटकांच्या सोयीसुविधांसाठी शहरावर कोट्यवधी खर्च करीत असताना दुसरीकडे शहरातील मूलभूत प्रश्नांकडे संबंधित विभागांनी गेल्या ४५ वर्षांत कधीही लक्ष न दिल्याने शहराची बकालावस्था झाली़ नगर- पंचायतनेही गेल्या चार वर्षांत या प्रश्नांकडे गांभीर्याने बघितले नसल्याने शहर झोपडपट्टीसारखे दिसत आहे़
पौराणिक पुराव्यानुसार श्रीक्षेत्र माहूर शहर अतिप्राचीन असून येथे देवदेवतांचा वास आहे़ तर ऐतिहासिक काळातील भक्कम पुरावे रामगड किल्ल्याच्या रुपात आजही भक्कमपणे उभे असल्याने पर्यटकही मोठ्या प्रमाणात येथे येतात़ अधिकाऱ्यांनी किल्ल्यासह जंगलाचे संरक्षण व्यवस्थित न केल्याने येथील निसर्गचक्रावर मोठा परिणाम झाला.
नगरपंचायतच्या मालकीची जागा : शहराच्या मुख्य चौकात नगरपंचायतच्या मालकीची मोठी जागा असून येथे किरकोळ व्यापाऱ्यांनी भाडेतत्वावर टीनशेडची दुकाने थाटून गेल्या ४० वर्षांपासून व्यापार सुरू केला आहे़ यासह ऩप़ने बनविलेले नऊ गाळे मोडकळीस आले. याला लागून तसेच मागे भरपूर जागेवर झोपडपट्टीसारखी दुकाने आहेत़ अनेकवेळा मान्यवरांनी या पूर्ण जागेवर अद्ययावत शॉपिंग कॉम्प्लेक्स बनवावे यासाठी पाठपुरावा केला होता़ परंतु सत्ताधाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले.
शहरासह तालुक्याला दुष्काळाचे चटके सहन करावे लागत आहेत़ भूमी अभिलेख कार्यालयाकडून सन १९७२ मध्ये शहराची मोजणी करण्यात आली़़ याचवर्षी डी़पी़ प्लॅनही तयार करण्यात आला़ भूमी अभिलेख कार्यालयात त्यावेळी गावात ६८४ मालमत्तांची नोंद घेण्यात आली़ नगरपंचायतच्या जागांची नोंद असून मंदिर, मशीद, दर्गाह, बौद्ध विहारासह डीपी प्लॅनमध्ये ४० पेक्षा जास्त ठिकाणी अनेक प्रकारचे आरक्षण टाकण्यात आले होते़ गेल्या चार वर्षांपर्यंत ग्रामपंचायत अस्तित्वात असल्याने या काळात डीपी प्लॅनसह भूमी अभिलेख कार्यालयातील नोंदी अद्ययावत करण्यासाठी कुठलीच अंमलबजावणी करण्यात न आल्याने ६८४ घरांचंी आज ऩप़ रेकॉर्डमध्ये १०० टक्के अदलाबदल झाली, परंतु या रेकॉर्डची मूळ पी़ आऱ कार्डमध्ये नोंद घेण्यात आली नाही़ मूळमालक हयात नाहीत याचीही नोंद घेण्यात आली नाही.

Web Title: Buy a reserved plot? The mahurat or!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.