नाफेड, राज्य शासनाकडून तीन लाख क्विंटल तूर खरेदी

By Admin | Published: May 29, 2017 12:24 AM2017-05-29T00:24:42+5:302017-05-29T00:25:21+5:30

लातूर : शहरासह जिल्ह्यात औसा, रेणापूर, चाकूर, शिरुर अनंतपाळ, अहमदपूर आदी ठिकाणी आधारभूत किंमत योजनेंतर्गत तूर खरेदी केंद्र सुरु करण्यात आले

Buy three lakh quintals of tur from NAFED, State Government | नाफेड, राज्य शासनाकडून तीन लाख क्विंटल तूर खरेदी

नाफेड, राज्य शासनाकडून तीन लाख क्विंटल तूर खरेदी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
लातूर : शहरासह जिल्ह्यात औसा, रेणापूर, चाकूर, शिरुर अनंतपाळ, अहमदपूर आदी ठिकाणी आधारभूत किंमत योजनेंतर्गत तूर खरेदी केंद्र सुरु करण्यात आले असून या केंद्रावरुन गेल्या आठ दिवसात ३४ हजार ८१० क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली आहे. नाफेड आणि राज्य सरकारकडून आतापर्यंत एकूण २ लाख ९८ हजार ८७५ क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यात नव्या तीन खरेदी केंद्राला मान्यता देण्यात आली आहे. आता जिल्ह्यातील एकूण नऊ केंद्रावर तुरीची खरेदी सुरु आहे.
लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीत सुरु करण्यात आलेल्या हमीभाव खरेदी केंद्रावर मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या शिल्लक तुरीची आवक होत आहे. विशेष म्हणजे तूर खरेदीदरम्यान झालेल्या गोंधळामुळे आता प्रशासनाने तूर खरेदी करण्यासाठी विविध अटी घातल्या आहेत. तूर खरेदी करण्यासाठी सातबारा, पीकपेरा, आधार आणि बँक खात्याची झेरॉक्सची प्रत शेतकऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्याकडे सादर करावी लागणार आहे़ या कागदपत्रांची तहसीलदारांकडून पडताळणी केल्यानंतर शेतकऱ्यांना टोकण दिले जाणार आहे. या टोकणच्या आधारे शेतकऱ्यांची तूर केंद्रावर खरेदी सध्याला सुरू आहे़ प्रशासनाने लादलेल्या जाचक अटींमुळे शेतकऱ्यांची कोंडी होत आहे़
उदगीर येथील तूर खरेदी केंद्रावर व्यापाऱ्यांची तूर खरेदी झाल्याच्या संशयावरुन येथील केंद्र बंद करण्यात आले होते. दरम्यान, उदगीर तालुक्यातील शेतकऱ्यांची तूर जळकोटच्या केंद्रावर खरेदी करण्यात आली़ मुदत संपल्यानंतर सर्वच केंद्र बंद करण्यात आली़
परिणामी, शेतकऱ्यांच्या शिल्लक तुरीचा प्रश्न गंभीर बनला. यामुळे शेतकऱ्यांनी पुन्हा तूर खरेदी केंद्र सुरु करण्यासाठी आंदोलन केले होते. शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन राज्य सरकारने तूर खरेदी केंद्रांना मुदतवाढ दिली. यानंतर लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती, रेणापूर, औसा, अहमदपूर, चाकूर आणि शिरुर अनंतपाळ येथे खरेदी केंद्र सुरु करण्यात आले़ लातूरच्या केंद्रावर निलंगा, देवणी आणि उदगीर तालुक्यातील तुरीची आवक मोठ्या प्रमाणावर झाल्याने येथील यंत्रणा कोलमडली. तूर घेऊन आलेल्या वाहनांच्या रांगा लागल्या. परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी उदगीर, निलंगा, देवणी येथे तीन केंद्र सुरु केले आहे.

Web Title: Buy three lakh quintals of tur from NAFED, State Government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.