उडीद-मूग खरेदी; कृषी अधीक्षकांना घेराओ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 12:17 AM2017-10-26T00:17:21+5:302017-10-26T00:17:29+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क हिंगोली : कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत नाफेडतर्फे शेतकºयांना उडीद-मूग खरेदीचे संदेश पाठविण्यात आले. मात्र शेतकºयांचा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत नाफेडतर्फे शेतकºयांना उडीद-मूग खरेदीचे संदेश पाठविण्यात आले. मात्र शेतकºयांचा माल पीक कापणी प्रयोग संकलन नोंदवही गोषवाºयाप्रमाणे आणेवारीनुसार खरेदी केला जात आहे. आणेवारीपेक्षा कमी उत्पन्न असलेल्यांची अडचण नाही. मात्र त्यापेक्षा थोडे उत्पन्न झालेल्यांचा मालच परत केल्याने शेतकरी आक्रमक झाले होते. यावेळी कृषी अधीक्षकांना घेराओ घालून याबाबत जाब विचारण्यात आला.
हिंगोली येथील नाफेड केंद्रावर २५ आॅक्टोबर रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास शेतकºयांनी आणेवारीप्रमाणे उडीद-मूग खरेदीस विरोध केला. पिकाचे सरासरी उत्पन्न ३६९.३७ हेक्टरप्रमाणे दाखवून नाफेडकडून खरेदी केले जात होते. त्यामुळे शेतमाल विक्रीस शेतकºयांनी विरोध केला. यंदा उडीद-मूग पिकाचे उत्पन्न जास्त झाल्याने उर्वरित मालाचे काय करायचे? असा प्रश्न शेतकºयांनी केला. यात काही क्विंटल ते दीड क्विंटलपेक्षा मोठी तफावत नाही. शिवाय आणेवारी ही सरासरीच काढली जाते. काही शेतकºयांनी शेजारच्याचही माल आणून वेळ व पैशांची बचत करण्याचा केलेला प्रयत्न अंगलट आला. अशांचा माल परत केला जात होता. याबाबत मराठा शिवसैनिक सेनेचे अध्यक्ष विनायक भिसे यांच्याकडे काही शेतकºयांनी गाºहाणे मांडले. त्यांनी नाफेडअंतर्गत शेतकºयांकडून येणाºया सर्वच उडीद-मुगाची खरेदी करण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाºयांना दिले. तसेच याबाबत कृषी अधीक्षक व्ही. डी. लोखंडे यांच्याशी चर्चा केली. नाफेडचे निकष चुकीचे असल्याचे सांगून रोष व्यक्त केला. तसेच यार्डातून माल कोठेही न हालविण्याचा पावित्रा घेतला. आणेवारीप्रमाणे होणारी खरेदी शेतकºयांना मान्य नाही. शिवाय उर्वरित मालाचा प्रश्नही निर्माण झाल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. यावर प्रशासकीय अधिकाºयांनी तोडगा काढण्याची मागणी शेतकºयांतून केली जात होती.
शेतकºयांच्या प्रतिक्रीया
शेतकरी राजू क्षीरसागर म्हणाले, सध्या आणेवारी प्रमाणे उडीद-मुगाची खरेदी केली जात आहे. परंतु शेतकºयांनी उर्वरित माल कोठे घेऊन जावा. शिवाय बाहेरील खरेदीही बंद आहे. याकडे शासनाने लक्ष देऊन शेतकºयांची समस्या सोडवावी.
जयपूर येथील फुलाजी गाडे म्हणाले, नाफेडतर्फे शेतकºयांना संदेशाद्वारे उडीद-मूग घेऊन येण्यास सांगितले. परंतु खरेदी कशी करणार. याबाबत काही म्हटलेच नव्हते. तर परसराम तांबिले म्हणाले, अर्धा माल येथे विकला तर उरलेला कोठे विकावा. बाहेरही दर पाडले जात आहेत. यावर शासनाने उपाय-योजना काढावी अशी मागणी केली.
सूर्यभान जगताप म्हणाले की, नाफेडने केवळ शेतमाल घेऊन येण्यास सांगितले. मात्र प्रत्यक्षात उडीद-मुग आणेवारी प्रमाणेच खरेदी करणार याबाबत मात्र काहीही सांगितले नाही.