रुंदीकरणासाठी बायपासची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 01:41 AM2018-07-10T01:41:03+5:302018-07-10T01:41:24+5:30

बायपास रोडवरील वाढते अपघात रोखण्यासाठी सोमवारी प्रथमच विविध शासकीय कार्यालयांचे अधिकारी आणि राजकीय मंडळी एकत्र आले. अपघातास निमंत्रण देणारे या रस्त्यावरील विद्युत खांब हटविण्याचा निर्णय घेण्यात आला. खांब हटविल्यास रस्ता आपोआप रुंद होतो, स्वतंत्र सर्व्हिस रोड करण्याची गरज नाही, असा सूर या भागातील मालमत्ताधारकांनी आळवला.

Bypass inspection for widening | रुंदीकरणासाठी बायपासची पाहणी

रुंदीकरणासाठी बायपासची पाहणी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : बीड बायपास रोडवरील वाढते अपघात रोखण्यासाठी सोमवारी प्रथमच विविध शासकीय कार्यालयांचे अधिकारी आणि राजकीय मंडळी एकत्र आले. अपघातास निमंत्रण देणारे या रस्त्यावरील विद्युत खांब हटविण्याचा निर्णय घेण्यात आला. खांब हटविल्यास रस्ता आपोआप रुंद होतो, स्वतंत्र सर्व्हिस रोड करण्याची गरज नाही, असा सूर या भागातील मालमत्ताधारकांनी आळवला.
देवडानगर आणि देवळाई चौकात मागील आठवड्यात दोन अपघातात निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागला. यानंतर पुन्हा एकदा बीड बायपासच्या रुंदीकरणाचा मुद्या ऐरणीवर आला. महापौर नंदकुमार घोडेले यांनी यासाठी पुढाकार घेतला. विविध शासकीय कार्यालयांचे अधिकारी एकत्र आणले.
सोमवारी सकाळी १० वाजेपासून महानुभाव आश्रम ते देवळाईपर्यंत रस्त्याची पाहणी करण्यात आली. सातारा-देवळाई भागातील नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहर विकास आराखड्यानुसार बायपास रस्त्याच्या दोन्ही बाजूने सर्व्हिस रोड दर्शविण्यात आला आहे. यापूर्वीच महापालिकेने मार्किंग केली आहे. मार्किंगनुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे महापौर घोडेले यांनी नागरिकांना सांगितले.
रस्त्याच्या कडेला ठिकठिकाणी वीज कंपनीचे खांब आहेत. हे खांबच अपघातास कारणीभूत ठरत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. विजेचे खांब युद्धपातळीवर हटविण्यात यावेत, असे आदेश महापौरांनी वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिले.
सातारा-देवळाई भागातील नागरिकांनी रस्ते, पाणी, ड्रेनेज व्यवस्था, पथदिवे आदी मूलभूत सोयी-सुविधांसाठी महापौरांना घेराव घातला होता.
यावेळी नगरसेवक गजानन बारवाल, सिद्धांत शिरसाट, नगरसेविका सायली जमादार, आयुक्त डॉ. निपुण विनायक, सहायक पोलीस आयुक्त एच. एस. भापकर, पोलीस निरीक्षक प्रेमसागर चंद्रमोरे, कै लास प्रजापती, वीज कंपनीचे कार्यकारी अभियंता अहिरे, राष्टÑीय महामार्गाचे अनिकेत कुलकर्णी, महेश पाटील, वर्ल्ड बँके च्या कार्यकारी अभियंता अरुंधती शर्मा आदींची उपस्थिती होती.

Web Title: Bypass inspection for widening

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.