मंत्रिमंडळ बैठकीसमोर मोठे आव्हान; आज ५ मोर्चे, ६ निदर्शने, १४ जणांचा आत्मदहनाचा इशारा

By सुमित डोळे | Published: September 16, 2023 12:47 PM2023-09-16T12:47:49+5:302023-09-16T12:48:23+5:30

क्रांती चौक, भडकल गेट मोर्चे निघणार, पोलिसांचे लक्ष आदर्श घोटाळ्याविरोधातल्या ‘गनिमी कावा’ आंदोलनाकडे

Cabinet in Chhatrapati Sambhajinagar; Today 5 marches, 6 demonstrations, 14 people's self-immolation warning | मंत्रिमंडळ बैठकीसमोर मोठे आव्हान; आज ५ मोर्चे, ६ निदर्शने, १४ जणांचा आत्मदहनाचा इशारा

मंत्रिमंडळ बैठकीसमोर मोठे आव्हान; आज ५ मोर्चे, ६ निदर्शने, १४ जणांचा आत्मदहनाचा इशारा

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : सात वर्षांनंतर होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीकडे सगळ्या मराठवाड्याचे लक्ष लागले आहे. त्यातच विविध संघटना, राजकीय पक्षांनी देखील या मंत्रिमंडळावर मोर्चा, निषेध, आंदोलनाची तयारी केली आहे. पोलिसांकडे जवळपास ३० पेक्षा अधिक संघटनांनी मोर्चा, आंदोलनाला परवानगी मागितली हाेती. यापैकी बहुतांश संघटनांनी पोलिसांच्या मध्यस्थीनंतर निर्णय मागे घेतला.

वैयक्तिक, सामाजिक मागण्यांसाठी जवळपास १५ जणांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता. त्यापैकी एकाची समजूत घालण्यात पोलिसांना यश आले असून १४ जणांनी आत्मदहनाचा निर्णय कायम ठेवला आहे.

एकूण मोर्चे - १५
-एकूण धरणे/ निदर्शने -०६
-निवेदन - ४
-मोर्चाचा मार्ग - क्रांती चौक ते भडकल गेट
-धरणे ठिकाण - भडकल गेट

आज यांचे मोर्चे निघणार
- नायकडा आदिवासी व लमाण समाज विकास फाउंडेशनतर्फे खडी कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी.
-पालिका कामगार कर्मचाऱ्यांच्या मागणीसाठी बहुजन कामगार शक्ती महासंघ.
-स्थायी समिती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे मराठवाडा विभागाला पाण्याची तूट भरून काढण्यासाठी तसेच शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची जबाबदारी शासनाने घेण्यासाठी.
-मातंग समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी लाेकस्वराज्य आंदोलन.
-आदिवासी कोळी महादेव, कोळी मल्हार जमात परिषदेकडून आदिवासी कोळी मल्हार कोळी या जमातीवर चाळीस वर्षांपासून होणाऱ्या अन्यायाविरुद्ध, तसेच जातीचे वैधता प्रमाणपत्र सुलभरीत्या मिळत नसल्याने.
-पांढरे वादळ महिला मोर्चा कृती समितीतर्फे विमुक्त जाती प्रवर्गातील बोगस घुसखोरीविरुद्ध.
-वंचित बहुजन आघाडीतर्फे मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करण्यासाठी.
-भारतीय क्रांती दलाकडून शेतकरी, कष्टकरी, दुष्काळ, कर्जमाफी अशा विविध मागण्यांसाठी.
-श्रमिक वर्तमानपत्र विक्रेते संघटनेकडून वृत्तपत्र विक्रेत्यांच्या विविध मागण्यांसाठी.
-कामगार एकता संघटनेकडून मनपा रेड्डी कंपनी तसेच कचरा संकलन कामगारांच्या वेतनवाढ, वेतन वेळेवर मिळण्यासाठी.
-शिवसेना महाराष्ट्र प्रदेश बक्कर कसाब खाटीक संघटनेकडून कत्तलखाना फी ५० रुपयांवरून १५ रुपये करण्यासाठी. तीन कत्तलखाने उभारण्यासाठी.
-आदर्श नागरी सहकारी पतसंस्था ठेवीदार संघर्ष कृती समितीच्या खा. इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली पैसे तत्काळ मिळण्यासाठी.
-मराठा क्रांती मोर्चा, पैठण तालुका मराठा आरक्षणासाठी पायी दिंडी.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना देण्यात येणारी निवेदने
- शहरा जिल्हा काँग्रेस कमिटीकडून मुख्यमंत्र्यांना शहराच्या विविध विकासकामांसाठी.
- सर्वपक्षीय दिव्यांग कृती समितीकडून मुख्यमंत्र्यांना.
- रोकनाथ भालेराव सचिव मातंग व दलित समाज सेवा मित्रमंडळ उपमुख्यमंत्र्यांना समाजाच्या मागणीसाठी.
- अनंत केरबाजी भवरे संविधान विश्लेषक पावसाळी अधिवेशनातील प्रलंबित मागण्यांसाठी.

धरणे व निदर्शने 
- भाकपकडून मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थिती व विविध प्रश्नांवर पैठण गेट किंवा शहागंज गांधी पुतळा.
- बार्टी बचाव कृती समितीकडून सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत विविध योजनांच्या मागण्यांसाठी.
- बहुजन मुक्ती मोर्चाकडून स्मार्ट सिटी परिसरात.
- महाराष्ट्र इंग्लिश स्कूल असोसिएशन इंग्रजी शाळांच्या मागण्यांसाठी.
- कास्ट्राइब बॅनरखाली शासकीय सेवेत असताना खासगी रुग्णालय चालविणाऱ्यांविरोधात अनिल मगरे यांची निदर्शने.
- मराठवाडा शिक्षक संघाकडून राज्य सरकारच्या विरोधात.

यांचा रद्द झाला
महाराष्ट्र राज्य महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद कामगार कर्मचारी संघटनेने मनपा कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी मोर्चाचे नियोजन केले होते. मात्र, मोर्चा रद्द झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
 

Web Title: Cabinet in Chhatrapati Sambhajinagar; Today 5 marches, 6 demonstrations, 14 people's self-immolation warning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.