कॅडेन्सने औरंगाबादला ७५ धावांत गुंडाळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 12:56 AM2018-05-15T00:56:32+5:302018-05-15T00:57:20+5:30
पुणे येथे एमसीएतर्फे सुरू असलेल्या सीनिअर सुपरलीग क्रिकेट स्पर्धेत कॅडेन्सने सोमवारी औरंगाबादचा पहिला डाव अवघ्या ७५ धावांत गुंडाळला आणि त्यानंतर हर्षद खडीवाले याच्या स्फोटक शतकी खेळीच्या बळावर सामन्यावरील आपली पकड मजबूत केली. औरंगाबादकडून राहुल शर्माने ५ गडी बाद करीत ठसा उमटवला. अक्षय वाईकर याच्या गोलंदाजीसमोर औरंगाबादचा पहिला डाव २५.३ षटकांत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे अवघ्या २५.३ षटकांत ७५ धावांत कोसळला.
औरंगाबाद : पुणे येथे एमसीएतर्फे सुरू असलेल्या सीनिअर सुपरलीग क्रिकेट स्पर्धेत कॅडेन्सने सोमवारी औरंगाबादचा पहिला डाव अवघ्या ७५ धावांत गुंडाळला आणि त्यानंतर हर्षद खडीवाले याच्या स्फोटक शतकी खेळीच्या बळावर सामन्यावरील आपली पकड मजबूत केली. औरंगाबादकडून राहुल शर्माने ५ गडी बाद करीत ठसा उमटवला.
अक्षय वाईकर याच्या गोलंदाजीसमोर औरंगाबादचा पहिला डाव २५.३ षटकांत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे अवघ्या २५.३ षटकांत ७५ धावांत कोसळला. औरंगाबादकडून सूरज सुलाने (१४), स्वप्नील चव्हाण (१२), सचिन लव्हेरा (१२), संदीप सहानी (१०) हेच दुहेरी धावा फटकावू शकले. कॅडेन्सकडून अक्षय वाईकरने १९ धावांत ६ गडी बाद केले. त्याला नीतेश सालेकरने २२ धावांत ३ गडी बाद करीत साथ दिली. प्रत्युत्तरात अनुभवी हर्षद खडीवाले याच्या शतकी तडाख्याच्या जोरावर कॅडेन्सने सामन्यावरील आपली पकड आणखी मजबूत करताना दिवसअखेर ८ बाद ३७० धावा करीत औरंगाबादवर २९५ धावांची भक्कम आघाडी घेतली. जय पांडे याच्या साथीने २०.२ षटकांतच १२९ धावांची सलामी देणाऱ्या हर्षद खडीवाला याने १०६ चेंडूंतच १७ चौकार व ५ षटकारांसह १२१ धावांची स्फोटक खेळी केली. जय पांडे याने ५६ चेंडूंत १० चौकार, २ षटकारांसह ६६, पारस रत्नपारखीने ९६ चेंडूंत ६ चौकार व एका षटकारासह ६९ व सिद्धेश वरघंटेने ५४ चेंडूंत ६ चौकार व ४ षटकारांसह ६६ धावांची आक्रमक खेळी केली. औरंगाबादकडून राहुल शर्मा याने १०२ धावांत ५ गडी बाद केले. स्वप्नील चव्हाणने ९८ धावांत २, तर प्रवीण क्षीरसागरने १ गडी बाद केला.