खासगी हॉस्पिटलच्या काउण्टरवरूनच करा फोन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:04 AM2021-04-23T04:04:31+5:302021-04-23T04:04:31+5:30
औरंगाबाद : कोरोना रुग्णांकडून खासगी हॉस्पिटल अवाजवी बिल आकारत असेल तर रुग्ण नातेवाइकांना तातडीने मदतीसाठी जिल्हा प्रशासनाने नियुक्त समिती ...
औरंगाबाद : कोरोना रुग्णांकडून खासगी हॉस्पिटल अवाजवी बिल आकारत असेल तर रुग्ण नातेवाइकांना तातडीने मदतीसाठी जिल्हा प्रशासनाने नियुक्त समिती सदस्यांशी संपर्क करता यावा यासाठी खासगी हॉस्पिटल्सच्या बिल काउण्टरवरच संपर्क क्रमांकाची यादी लावण्याचे आदेश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी गुरुवारी दिले.
जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गुरुवारी बैठक झाली. खासगी हॉस्पिटल्सकडून डिस्चार्ज झालेल्या आणि बिलांसंदर्भातचा अहवाल रोज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्रशासनाला मिळावा. जास्त रक्कम वाटणाऱ्या बिलांची तातडीने शहानिशा करावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी समितीला दिल्या. समितीत २६ सदस्यांचा समावेश आहे. बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, उपजिल्हाधिकारी आप्पासाहेब शिंदे, बी.बी. नेमाने आदींची उपस्थिती होती.
ऑक्सिजन प्लांटची पाहणी
औरंगाबाद : जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सिग्मा हॉस्पिटल येथील एअरऑक्स इन या ऑक्सिजन प्लांटची पाहणी केली. यावेळी प्लांट बसविणारे संजय जैस्वाल, हॉस्पिटलचे डॉ.उन्मेष टाकळकर यांची उपस्थिती होती.