केम्ब्रिजवर मात करीत स.भु. अंतिम फेरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 12:53 AM2018-03-22T00:53:04+5:302018-03-22T00:54:02+5:30

गोलंदाजांनी केलेल्या सुरेख कामगिरीच्या बळावर सरस्वती भुवन प्रशालेने लोकमत टाइम्स कॅम्पस क्लब आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत केम्ब्रिज संघावर ९ गडी राखून दणदणीत विजयासह दिमाखात अंतिम फेरीत धडक मारली. सरस्वती भुवन प्रशालेची गाठ आता उद्या, गुरुवारी नाथ व्हॅली संघाविरुद्ध पडणार आहे.

 Cambridge beat SB In the final round | केम्ब्रिजवर मात करीत स.भु. अंतिम फेरीत

केम्ब्रिजवर मात करीत स.भु. अंतिम फेरीत

googlenewsNext
ठळक मुद्देआंतरशालेय क्रिकेट स्पर्धा : आज नाथ व्हॅलीसोबत विजेतेपदासाठी झुंज

औरंगाबाद : गोलंदाजांनी केलेल्या सुरेख कामगिरीच्या बळावर सरस्वती भुवन प्रशालेने लोकमत टाइम्स कॅम्पस क्लब आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत केम्ब्रिज संघावर ९ गडी राखून दणदणीत विजयासह दिमाखात अंतिम फेरीत धडक मारली. सरस्वती भुवन प्रशालेची गाठ आता उद्या, गुरुवारी नाथ व्हॅली संघाविरुद्ध पडणार आहे.
गोलंदाजांनी केलेल्या सुरेख कामगिरीच्या बळावर सरस्वती भुवनने बुधवारी झालेल्या उपांत्य फेरीच्या लढतीत प्रथम फलंदाजी करणाऱ्या केम्ब्रिजला १0 षटकांत ६ बाद ५१ धावसंख्येत रोखले. त्यांच्याकडून संकेत पाटील (२४) याच्याशिवाय एकही फलंदाज दुहेरी आकडी धावा पार करू शकला नाही. सरस्वती भुवन प्रशालेकडून आदित्य राजहंस याने १५ धावांत २ गडी बाद केले. त्याला चैतन्य वाघमारे, प्रसाद कुलकर्णी, मंदार कुलकर्णी यांनी प्रत्येकी १ गडी बाद करीत साथ दिली. त्यानंतर सरस्वती भुवनने विजयी लक्ष्य ७ षटकांत फक्त १ गडी गमावून गाठले. त्यांच्याकडून कृष्णा पवार याने १९ चेंडूंतच ४ खणखणीत चौकारांसह २५ धावा फटकावल्या. आदित्य राजहंसने १0 चेंडूंत एका चौकारांसह नाबाद १२ धावा केल्या. या सामन्यात कृष्णा पवार सामनावीर किताबाचा मानकरी ठरला. उद्या, गुरुवारी सकाळी ८.३0 वाजता सरस्वती भुवन आणि नाथ व्हॅली यांच्यात अंतिम फेरीचा सामना रंगणार आहे. अंतिम सामन्यानंतर ११.३0 वाजता बक्षीस वितरण रंगणार आहे.
बक्षीस वितरण सोहळ्यात विजय झोल राहणार आकर्षण
उद्या, गुरुवारी सकाळी ११.३0 वाजता होणाºया लोकमत टाइम्स कॅम्पस क्लब आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेच्या बक्षीस वितरणास रणजीपटू आणि अंडर १९ वर्ल्डकप संघाचा माजी कर्णधार विजय झोल हा आकर्षण ठरणार आहे. यावेळी औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेचे सचिव सचिन मुळे यांचीही प्रमुख उपस्थिती असणार आहे.
२0११ मध्ये कुचबिहार करंडक क्रिकेट स्पर्धेत नाबाद ४५१ धावांची विक्रमी खेळी करणाºया विजय झोल याने २0१२ मध्ये १९ वर्षांखालील विश्विजेत्या भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. तसेच २0१४ वर्ल्डकपमध्ये तो अंडर १९ भारतीय संघाचा कर्णधार होता. विजय झोलने न्यूझीलंडविरुद्ध प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये शतक ठोकत पदार्पण केले. तसेच रणजी करंडकाच्या पदार्पणातही द्विशतक ठोकण्याचा पराक्रम केला आहे. २0१४ मध्ये महाराष्ट्राला अंतिम फेरीत पोहोचविण्यातही त्याने निर्णायक योगदान दिले होते.
संक्षिप्त धावफलक
केम्ब्रिज : १0 षटकांत ६ बाद ५१. (संकेत पाटील नाबाद २४, आदित्य राजहंस २/१५).
सरस्वती भुवन प्रशाला : ७ षटकांत १ बाद ५२. (कृष्णा पवार नाबाद २५, आदित्य राजहंस नाबाद १२. रौनक डोडिया १/१२).

Web Title:  Cambridge beat SB In the final round

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :