उद्या सकाळी ९ वाजेपासूनच केंब्रिज चौक ते नगर नाका रस्ता वाहतुकीस पूर्ण बंद
By सुमित डोळे | Published: July 12, 2024 05:08 PM2024-07-12T17:08:32+5:302024-07-12T17:12:58+5:30
नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त शीलवंत नांदेडकर यांनी केले आहे.
छत्रपती संभाजीनगर :मराठा आरक्षण जनजागृती आणि महाशांतता रॅलीचा सहावा टप्पा शनिवारी (दि.१३) शहरात पार पडत आहे. त्यामुळे पहिल्यांदाच शहराची मुख्य वाहिनी समजला जाणारा जालना रोड केंब्रिज चौक ते नगर नाकापर्यंत सकाळी ९ वाजेपासून बंद राहणार आहे. रॅली संपेपर्यंत तो बंदच राहील. नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त शीलवंत नांदेडकर यांनी केले आहे.
सकाळी ९ वाजताच रस्ता बंद
पोलिसांकडून ९ वाजताच केंब्रिज चौक ते नगर नाका १४.८ किमीचा रस्ता रॅली संपेपर्यंत बंद करण्यात येईल. त्यासोबतच क्रांती चौकाला जोडणारा कोकणवाडी चौक ते सिल्लेखाना चौक या मार्गावर देखील सर्व प्रकारची वाहतूक बंद असेल.
हे पर्यायी मार्ग वापरा:
-केंब्रिज चौक, झाल्टा फाटा ते बीड बायपास मार्गे महानुभव आश्रम चौक या मार्गे जातील व येतील.
-केंब्रिज चौक ते सावंगी बायपास, हर्सुल टी, हडको कॉर्नर, अण्णा भाऊ साठे चौक, सिटी क्लब, मिलकॉर्नर, महावीर चौक (बाबा पेट्रोलपंप)
-नगर नाका, लोखंडी पूल, पंचवटी, रेल्वेस्थानक मार्गे महानुभव चौक.
-कोकणवाडी चाैक, पंचवटी चौक, महावीर चौक मार्गे पुढे जातील व येतील.
छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्या सकाळी ९ वाजेपासूनच केंब्रिज चौक ते नगर नाका, कोकणवाडी चौक ते सिल्लेखाना रस्ता पूर्णपणे बंद राहणार #maharareservation#chhatrapatisambhajinagarpic.twitter.com/PRN0O5FeEx
— Lokmat Chhatrapati Sambhajinagar (@milokmatabd) July 12, 2024
जशी रॅली पुढे जाईल, तसे चौक उघडे केले जातील.
रॅली पुढे गेल्यानंतर रस्ते मोकळे झाले तर वाहतूक पोलिस टप्प्याटप्प्यांमध्ये मागील चौक वाहतुकीसाठी खुले करत जातील. क्रमाने शहरातील अंतर्गत रस्त्यांवरचा भार कमी होत जाईल.
२६५ वाहतूक पोलिस अधिकाऱ्यांवर जबाबदारी
केवळ वाहतूक नियोजनाची २६५ पोलिस अधिकारी, अंमलदारांवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
-त्याशिवाय १०० होमगार्ड व गरज पडल्यास आयुक्तालयातील राखीव ५० पोलिस वाहतूक नियोजनासाठी रस्त्यावर उतरवले जातील.
बाहेरील तालुक्यातून येणाऱ्यांसाठी पार्किंग व्यवस्था
१.जालना, करमाडकडून येणाऱ्या वाहनांसाठी - रामनगर कमानीसमोर ग्रॅमफोर्थ समोरील पार्किंग.
२.सिल्लोड, फुलंब्रीकडून येणाऱ्या वाहनांसाठी - शरद टी सिग्नलजवळील खुले मैदान.
आंबेडकर चौक पिसादेवी रोडवरील राममंदिर ट्रस्ट मैदान, मिलिनियम पार्क मैदान.
३. कन्नड, वैजापूर, नगर रोडकडून येणाऱ्या वाहनांसाठी - आयकर भवनजवळील फुटबॉल मैदान, कर्णपुरा पार्किंग.
४. पाचोड, आडोळकडून येणाऱ्या वाहनांसाठी - जबिंदा मैदान.
५. बिडकीन, पैठणकडून येणाऱ्या वाहनांसाठी - अयोध्या मैदान.
२४ ठिकाणी ब्लॉकिंग पॉइंट, त्यामुळे जालना रोडवर वाहनांना बंदीच
जालना रोडवर जोडले जाणारे महत्त्वाचे २४ चौक बॅरिकेडब्लॉक केले जातील. यात प्रामुख्याने केंब्रिज चौक, मुकुंदवाडी येथील एसटी वर्कशॉप, एपीआय कॉर्नर, सिडको चौकातील कामगार चौक व जळगाव रोडकडे जाणारे मार्ग, हायकोर्ट चौक, कॅनॉटकडून रामगिरीकडे येणारा मार्ग, एअर इंडियाचे कार्यालय, मनियार दुकानाजवळील चौक (एमजीएम), गजानन महाराज मंदिरापासून जालना रोडच्या दिशेने चौक बंद केला जाईल, ॲपेक्स रुग्णालय मार्ग, त्रिमूर्ती चौक, लक्ष्मण चावडी, अजबनगर, बंजारा कॉलनी, सावजी रुग्णालय, सिल्लेखाना, उस्मानपुरा चौक, काल्डा कॉर्नर, कोकणवाडी, जिल्हा न्यायालय चौक, रमानगर, महावीर चौक बॅरिकेड्स लावून बंद केले जातील.
पोलिसांसमोर ही आहेत आव्हाने
-जालना रोडवर मोठ्या संख्येने प्रमुख रुग्णालये आहेत. त्यामुळे रुग्णांची ने-आण करणाऱ्या रुग्णवाहिकांना मार्ग काढून देणे.
-शहरातील अंतर्गत रस्त्यांवरील वाहतुकीचे नियोजन करणे.
-वाळुज औद्योगिक वसाहतींमधील कामगारांच्या बसेस अंतर्गत छोट्या रस्त्यांवर उतरल्यानंतर वाहतुकीचा मोठा खोळंबा होण्याची दाट शक्यता.
...तर बऱ्यापैकी भार कमी होईल
शहरातील बहुतांश अंतर्गत रस्त्यांवरच वाहने, ग्राहकांची वाहने उभी असतात. शनिवारी या सर्व मार्गांवरील पार्किंग न करण्यासाठी सक्त सूचना केल्यास संत एकनाथ नाट्यमंदिर मार्ग, चिश्तिया चौक ते सेंट्रल नाका, बजरंग चौक, शहानूरमिया दर्गा ते सूतगिरणी चौक, जयभवानीनगर ते गजानन महाराज मंदिर चौकामध्ये मोठ्या प्रमाणावर वाहने उभी असतात.