कन्नडमध्येही मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:02 AM2021-08-18T04:02:16+5:302021-08-18T04:02:16+5:30

कन्नड : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने कोरोनावर नियंत्रण व मात करण्यासाठी महिला बालविकास विभाग व जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग ...

Campaign in Kannada too | कन्नडमध्येही मोहीम

कन्नडमध्येही मोहीम

googlenewsNext

कन्नड : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने कोरोनावर नियंत्रण व मात करण्यासाठी महिला बालविकास विभाग व जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने १७ ते ३० ऑगस्ट या कालावधीत विशेष धडक मोहीम नियोजन प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. तालुक्यातील सर्व अंगणवाड्यांमध्ये ० ते ६ वर्षे वयोगटातील बालकांची सखोल आरोग्य तपासणी, लसीकरण व सॅम आणि बालकांची शोध मोहिमेंतर्गत बालकांची वजने, उंची, लांबी घेणे हा कार्यक्रम चालणार आहे. शंभर टक्के बालकांची वजने, उंची घेऊन त्यातील साधारण श्रेणी सॅम व मॅम श्रेणी निवडून दुर्बल बालकांना पुढील उपचारासाठी दवाखान्यात भरती केले जाणार आहे. तर सॅम बालकांची व्हीसीडीसी सुरु केली जाणार आहे. अशी माहिती प्रकल्प(१) अधिकारी ज्योत्स्ना गहेरवार यांनी दिली.

Web Title: Campaign in Kannada too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.