वाळूजमध्ये दोन औषधी दुकाने फोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 07:50 PM2018-11-19T19:50:17+5:302018-11-19T19:50:42+5:30

वाळूज महानगर: वाळूज परिसरात चोरट्यांनी आता औषधी दुकानांकडे मोर्चा वळविला असून, वाळूज दोन औषधी दुकाने फोडल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली आहे. चोरट्यांनी या दोन्ही दुकानांचे शटर उचकटून २० हजार रोख व कॉस्मेटिक साहित्य लांबविले आहे.

 In the canal, two shops of medicines broke | वाळूजमध्ये दोन औषधी दुकाने फोडली

वाळूजमध्ये दोन औषधी दुकाने फोडली

googlenewsNext

वाळूज महानगर: वाळूज परिसरात चोरट्यांनी आता औषधी दुकानांकडे मोर्चा वळविला असून, वाळूज दोन औषधी दुकाने फोडल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली आहे. चोरट्यांनी या दोन्ही दुकानांचे शटर उचकटून २० हजार रोख व कॉस्मेटिक साहित्य लांबविले आहे.


वाळूजच्या कमळापूररोडवर शरद रतन बोडखे यांचे मेडिकल स्टोअर्स आहे. रविवारी रात्री दुकान बंद केल्यानंतर बोडखे हे घरी निघून गेले. मध्यरात्रीनंतर चोरट्याने या दुकानाचे शटर उचकटुन गल्ल्यात ठेवलेले रोख ८ हजार रुपये तसेच विविध कंपन्यांची सौंदर्य प्रसाधने आदीसह जवळपास १० ते १२ हजारांचा ऐवज लंपास केला. याच रोडवरील बंडु रामदास आमके यांचेही मेडिकल स्टोअर्स अशाच पद्धतीने फोडले. दुकानातील रोख १० हजार ७०० रुपये व विविध कंपन्याची सौंदर्य प्रसाधाने चोरट्यांनी लांबविली.

वाळूज पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणी चोरट्यांविरुध्द वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दिवाळीपासून वाळूजला चोऱ्याचे प्रमाण वाढले असून पोलिस प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष असल्यामुळे व्यवसायिक व नागरिकात भितीचे वातावरण पसरले आहे.

चोरट्यांचा मोर्चा औषधी दुकानाकडे
वाळूज व एमआयडीसी परिसरात तीन दिवसांत चोरट्यांनी तीन औषधीचे दुकाने फोडुन रोख रकमेसह जवळपास ६० हजारांचा ऐवज लांबविला आहे. आता चोरट्यांनी आपला मोर्चा औषधी दुकानाकडे वळविल्यामुळे औषध विक्रेत्यात खळबळ उडाली आहे. या परिसरात पोलिसांची गस्त वाढविण्याची मागणी नागरिकांसह व्यावसायिकांतून केली जात आहे.

Web Title:  In the canal, two shops of medicines broke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.