‘कॅन्सर भयंकर नाही, तो बरा होतो...’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:04 AM2021-09-22T04:04:07+5:302021-09-22T04:04:07+5:30

औरंगाबाद : ‘कॅन्सर खरंच एवढा भयंकर आहे का... तर नाही... कॅन्सरचे सुरुवातीलाच निदान झाले तर योग्य उपचाराने तो पूर्ण ...

‘Cancer is not terrible, it is cured ...’ | ‘कॅन्सर भयंकर नाही, तो बरा होतो...’

‘कॅन्सर भयंकर नाही, तो बरा होतो...’

googlenewsNext

औरंगाबाद : ‘कॅन्सर खरंच एवढा भयंकर आहे का... तर नाही... कॅन्सरचे सुरुवातीलाच निदान झाले तर योग्य उपचाराने तो पूर्ण बरा होऊ शकतो...’ अशी जनजागृती करणाऱ्या चित्रफितीचे मंगळवारी शासकीय कर्करोग रुग्णालय म्हणजे राज्य कर्करोग संस्थेत लोकार्पण करण्यात आले.

शहरातील शासकीय कर्करोग रुग्णालयाने मंगळवारी (दि. २१ ) दहाव्या वर्षात पदार्पण केले. वर्धापन दिनानिमित्त रुग्णालयात जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी अधिष्ठाता डाॅ. कानन येळीकर, रुग्णालयाचे विशेष कार्यअधिकारी डाॅ. अरविंद गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. वैद्यकीय अधीक्षक डाॅ. अजय बोराळकर, डाॅ. बालाजी शेवाळकर, डाॅ. अनघा वरूडकर, डाॅ. वर्षा देशमुख, डाॅ. अर्चना राठोड, डाॅ. संगीता पाटील, डाॅ. प्रशांत केचे, डाॅ. दर्पण जक्कल, डाॅ. आदिती लिंगायत, डाॅ. ऋषीकेश खाडीलकर, जनार्दन राठोड, कांता खंडेभराड यांची यावेळी उपस्थिती होती.

यावेळी डाॅ. येळीकर यांच्या हस्ते शासकीय कर्करोग रुग्णालयातील सेवा सुविधा आणि जनजागृतीपर चित्रफितीचे लोकार्पण करण्यात आले. तसेच किरणोपचार विभागप्रमुख डाॅ. बालाजी शेवाळकर यांच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. डाॅ. पूजा तोतला यांनी सूत्रसंचालन केले. डाॅ. ज्योती कोडगिरे यांनी आभार मानले.

कार्यक्रमासाठी बालाजी देशमुख, इंदल जाधव, संदीप भडांगे, संध्या सोनवणे, सोनाली राऊत, अजय देवकते, जावेद देशमुख, आदींनी प्रयत्न केले.

--

फोटो ओळ..

शासकीय कर्करोग रुग्णालयाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमप्रसंगी दीपप्रज्वलन करताना अधिष्ठाता डाॅ. कानन येळीकर. याप्रसंगी उपस्थित विशेष कार्यअधिकारी डाॅ. अरविंद गायकवाड आणि रुग्णालयातील डाॅक्टर्स.

Web Title: ‘Cancer is not terrible, it is cured ...’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.