उमेदवारांना मोबाईल अ‍ॅपवर दाखल करता येईल निवडणुकीचा खर्च

By Admin | Published: January 14, 2017 12:27 AM2017-01-14T00:27:00+5:302017-01-14T00:27:42+5:30

लातूर : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने अँड्रॉईड मोबाईलसाठी अ‍ॅप विकसित केले

Candidates can file on mobile app for election expenses | उमेदवारांना मोबाईल अ‍ॅपवर दाखल करता येईल निवडणुकीचा खर्च

उमेदवारांना मोबाईल अ‍ॅपवर दाखल करता येईल निवडणुकीचा खर्च

googlenewsNext

लातूर : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने अँड्रॉईड मोबाईलसाठी अ‍ॅप विकसित केले असून याचे वैशिष्ट्ये म्हणजे या अ‍ॅपवरुन निवडणुकीला उभ्या असलेल्या उमेदवाराला आपला खर्च आॅनलाईन पध्दतीने दाखल करता येणार आहे. उमेदवाराबरोबच निवडणूक निर्णय अधिकारी, मतदार या दोघांनाही उपयुक्त असलेले हे अ‍ॅप मतदारांना आपल्या मतदान केंद्रापर्यंतचा रस्ताही दाखविणार आहे. निवडणूक आयोगाने मतदान प्रक्रियेत आॅनलाईन प्रणाली वाढविण्याच्या दृष्टीने हे टाकलेले मोठे पाऊल ठरण्याची चिन्हे आहेत.
भारतातील निवडणुकांमधील कामे मोठ्या प्रमाणात ‘मॅन्युअल’ पध्दतीने करावी लागतात. परंतु, आता ‘कॅशलेश’ व्यवहार वाढविण्यासाठी आॅनलाईन साधनांचा वाढता वापर आता निवडणुकीच्या रणधुमाळीतही वाढतो आहे. राज्याच्या निवडणूक आयोगानेही निवडणुकीसाठी एक मोबाईल अ‍ॅप विकसित केले आहे. ‘ळ१४ी श्ङ्म३ी१’ हे त्या अ‍ॅपचे नाव. या अ‍ॅपमध्ये दहा ते पंधरा वेगवेगळे फोल्डर आहेत. प्रत्येक फोल्डर वेगळ्या कामांसाठी वापरता येते. विशेष म्हणजे हे अ‍ॅप उमेदवार, निवडणूक निर्णय अधिकारी आणि मतदार या तिघांनाही अत्यंत उपयुक्त आहे. उमेदवाराला यावर आपली शपथपत्रे जमा करता येतात.
दैनंदिन खर्चाचेही आॅनलाईन रिपोर्र्टींग करता येते. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनाही हे अ‍ॅप वापरुन आपले कर्मचारी कुठे आहेत ? काय काम करताहेत ? याची खबर ठेवता येते. त्यांनी केलेल्या कामाची नोंद थेट राज्य निवडणूक आयोगापर्यंत क्षणाधार्थ होते. वेगवेगळ्या स्तरावरील प्रशासकीय अधिकाऱ्यांसाठी हे अ‍ॅप वापरताना वेगवेगळे पासवर्ड टाकून ते ज्यांच्याकडे ज्याची जबाबदारी तेवढेच पाहता येईल, याची व्यवस्था केली आहे. याशिवाय मतदार राजांना आपले मतदान कोणत्या केंद्रावर आहे, याची घरबसल्या माहिती मिळते. आपल्या मतदान केंद्राचा पत्ता माहित नसल्यास हे गुगलशी जोडलेले अ‍ॅप मतदात्याला मतदान केंद्रावर जाण्यासही मदत करते. निवडणूक प्रक्रिया आणि त्याबाबतचे कामकाज या अ‍ॅपमुळे सोपे होणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Candidates can file on mobile app for election expenses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.