जिल्ह्यात .... जागांसाठी उमेदवारांनी अर्ज केले दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:05 AM2020-12-31T04:05:11+5:302020-12-31T04:05:11+5:30
ग्रामीण भागात निवडणुकांचा ज्वर चढला असून, गावातील पारांवर यावरच चर्चा घडत आहेत. गावपातळीवर पॅनल बनवून विविध डावपेच आतापासूनच आखायला ...
ग्रामीण भागात निवडणुकांचा ज्वर चढला असून, गावातील पारांवर यावरच चर्चा घडत आहेत. गावपातळीवर पॅनल बनवून विविध डावपेच आतापासूनच आखायला सुरुवात झाली आहे. ग्रामीण भागावर वर्चस्व मिळविण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व भाजप या पक्षांनीही चंग बांधला असून त्यादृष्टिकोनातून काम सुरू केले आहे. बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने सर्वच तहसील कार्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होती. यात अनेक वेळा ऑनलाइनचा व्यत्यय आला. सायंकाळपर्यंत सर्वच उमेदवार अर्ज दाखल करण्यासाठी घाई करीत होते, तसेच उमेदवारांसाेबत आलेल्या हौशागौशांचीही तेथे गर्दी झाली होती.
चौकट
१५ जानेवारी रोजी मतदान
ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी बुधवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. ३१ डिसेंबर रोजी सर्व अर्जांची त्या त्या तालुक्यातील तहसील कार्यालयांत छाननी होणार आहे. ४ जानेवारीपर्यंत अर्ज मागे घेणे व चिन्हांचे वाटप होणार आहे. १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून, १८ जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे.
फोटो : गंगापूर तहसील कार्यालयाच्या निवडणूक विभागात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी झालेली गर्दी.