एका-एका मतासाठी उमेदवारांचा आटापिटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:07 AM2021-01-13T04:07:14+5:302021-01-13T04:07:14+5:30
लाडसावंगी : कोरोनाकाळात आम्हाला गावाबाहेरच थांबा, असे सांगितले. आता गरज पडली तर फोन करून का बोलाविता, असा सवाल बाहेरगावी ...
लाडसावंगी : कोरोनाकाळात आम्हाला गावाबाहेरच थांबा, असे सांगितले. आता गरज पडली तर फोन करून का बोलाविता, असा सवाल बाहेरगावी राहणारे मतदार करत आहेत. लाडसावंगी गावातील ग्रामपंचायत निवडणुकीत नशीब आजमावत असलेले उमेदवार बाहेरगावी असलेल्यांना गावात या, असे आवाहन करत आहे.
१५ जानेवारीला मतदान होणार असून प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. त्यात एका-एका मताची जुळवणी करण्यासाठी उमेदवार जीवाचा आटापीटा करत आहेत. बाहेरगावी काम, नोकरीनिमित्त राहणाऱ्या व ज्यांचे मतदान गावात आहे. अशा मतदारांना उमेदवार फोनरून मतदान करण्यासाठी आवाहन करत आहेत; परंतु गेल्यावर्षी एप्रिल-मे महिन्यात कोरोना महामारीचे संकट होते. कामधंदे बंद असल्यामुळे गावाबाहेर असलेले गावकरी गावात आले असता. त्यांना दहा दिवस गावात येऊ दिले नाही. कुणी शेतावर थांबले तर कुणी शाळेत जणू आमच्यावर बहिष्कार टाकल्यासारखी वागणूक मिळाली. मग आता तेच पुढारी ग्रामपंचायत निवडणुकीत उभे असल्यामुळे त्यांना मतदान का करावे, त्यांच्या विनंतीला का मान द्यावा, असा प्रश्न मतदार करत आहेत.