कर्णकर्कश हॉर्न पोलिसांना ऐकू येत नाही का रे भाऊ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:02 AM2021-06-25T04:02:12+5:302021-06-25T04:02:12+5:30

राम शिनगारे औरंगाबाद : कोरोनामुळे लावलेले निर्बंध शिथिल करताच शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ वाढली आहे. यात सुसाट ...

Can't the police hear the honking horn, brother? | कर्णकर्कश हॉर्न पोलिसांना ऐकू येत नाही का रे भाऊ?

कर्णकर्कश हॉर्न पोलिसांना ऐकू येत नाही का रे भाऊ?

googlenewsNext

राम शिनगारे

औरंगाबाद : कोरोनामुळे लावलेले निर्बंध शिथिल करताच शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ वाढली आहे. यात सुसाट धावणारे आणि कर्णकर्कश हॉर्न वाजवणाऱ्या दुचाकीस्वारांनी तर उच्छाद मांडला आहे. वाहतूक पोलीस सिग्नल तोडणे, नो पार्किंग झाेनमध्ये गाडी लावणारे, हेल्मेट न वापरणारांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करीत आहेत. मात्र त्या तुलनेत हॉर्न वाजवणारांवर कारवाई करणारांचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे कर्णकर्कश हॉर्न पोलिसांना ऐकू येत नाही का रे भाऊ? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

जलप्रदूषण, हवा प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत आहे. शहरांमध्ये तर या तिन्ही प्रदूषणात मोठ्या प्रमाणात भर पडत आहे. हे प्रदूषण रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येतात. ध्वनी प्रदूषण करण्यात सर्वाधिक महत्त्वाचा घटक असलेल्या वाहनांचा हॉर्न वाजविणारांवर कारवाई करण्याचा अधिकार वाहतूक पोलिसांना असतो. सध्या तरुणांमध्ये बुलेट गाड्यांची मोठ्या प्रमाणात क्रेझ आहे. या गाड्यांचा हॉर्नसह सायलेन्सरचा आवाजही मोठ्या प्रमाणात येतो. तो अधिक यावा यासाठी हे दुचाकीस्वार प्रयत्न करतात. यात नियमांचे उल्लंघनही करण्यात येत असते. त्यामुळे पोलिसांनी अशा नियम मोडणाऱ्या तरुणांवर कारवाई करणे आवश्यक असते. मात्र तसे होताना दिसत नाही. वाहतूक पोलिसांच्या समोरुन हे युवक कर्णकर्कश हॉर्न वाजवून निघून जातात. त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात नियमानुसार दंडाची कारवाई होत नसल्यामुळे अशा युवकांचे धाडस वाढले आहे. त्यामुळे अशा युवकांवर कारवाई करण्याची मागणी पुढे आली आहे.

वाहनचालकांना झालेला दंड

वर्ष सिग्नल तोडला नो पार्किंग हेल्मेट नाही कर्णकर्कश हॉर्न

२०२० १८,८९२ १४,५७४ १५,४९९ ७७७

२०२१ (मे पर्यंत) १६,१९६ ४,९३५ १४,४०० ५१५

बॉक्स

कर्णकर्कश हॉर्न वाजवला तर...

कर्णकर्कश हॉर्न वाजविल्यानंतर विविध कलमान्वये दंड करण्याची तरतूद कायद्यात आहे. यात केंद्र शासन, राज्य शासनाचा स्वतंत्र कायदा आहे. सायलेंट झोंनमध्ये हॉर्न वाजविल्यास २०० रुपये दंड आकारला जातो. त्याशिवाय मल्टीपल प्रमाणात हॉर्न वाजविल्यास दंडाची रक्कम ५०० रुपयांपर्यंतही वाढविण्यात येऊ शकते, अशी माहिती वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

बॉक्स

फॅन्सी हॉर्नची फॅशन

भरधाव वेगाने धावणाऱ्या गाड्यांची युवकांमध्ये प्रचंड प्रमाणात क्रेझ आहे. या महागड्या गाड्या आई-वडिलांकडून खरेदी केल्यानंतर रस्त्यावर लक्ष वेधून घेण्यासाठी कर्णकर्कश हॉर्न बसवून घेतात. एका युवकाने असा हॉर्न बसविला की त्याचा मित्र पुनरावृत्ती करतो. यातूनच हे प्रमाण वाढत आहे.

बॉक्स

कायमस्वरुपी बहिरेपणा येऊ शकतो

कानामध्ये बाह्य कर्ण, अंर्तकर्ण,मध्य कर्ण असतात. अंर्तकर्णामध्ये विशिष्ट प्रकारच्या विविध पेशी असतात. त्याला एअर सेल म्हणतात. त्या एअर सेलला या कर्णकर्कश आवाजामुळे हानी पोहचत असते. काही वेळी ही हानी तात्पुरत्या स्वरुपात असते. मात्र सतत कर्णकर्कश आवाज कानी पडत असेल तर कानांना कायमस्वरुपी बहिरेपणा येऊ शकतो, अशी माहिती घाटीतील कान, नाक आणि घसा विभागाचे प्रमुख डॉ. सुनील देशमुख यांनी दिली.

कोट,

गाडी पकडल्यास हॉर्न काढून टाकतोत

कर्णकर्कश हॉर्न असणाऱ्या गाड्यांची संख्या अत्यल्प आहे. काही हौशी युवकच असे हॉर्न बसवून घेतात. जेव्हा वाहतूक पोलीस कर्मचारी, अधिकारी गाडी पकडतात. तेव्हा ज्या गाडीला अशा पद्धतीचे हॉर्न असतात. ते काढून टाकल्यानंतरच चलन फाडले जाते. त्यानंतर गाडी संबंधित वाहनचालकास दिली जाते. कोणत्याही कर्णकर्कश हॉर्नवाल्यांना सोडून दिले जात नाही. तसेच पोलिसांना लांबून पाहिल्यास वाहनधारक हॉर्न वाजवत नाही. हे हॉर्न आतमध्ये बसविलेले असतात त्यामुळे अनेकवेळा दिसून येत नाहीत. तरीही पोलीस शोधून काढतात.

-मुकुंद देशमुख, पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा

Web Title: Can't the police hear the honking horn, brother?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.