औरंगाबादचा अंकित भारत अ संघाचा कॅप्टन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2018 12:46 AM2018-03-01T00:46:11+5:302018-03-01T00:46:53+5:30
वर्षानुवर्षे खोºयाने धावा फटकावत कमालीचे सातत्य राखणारा महाराष्ट्राचा शैलीदार फलंदाज अंकित बावणे हा धर्मशाळा येथे ४ ते ८ मार्चदरम्यान होणाºया देवधर करंडक क्रिकेट स्पर्धेत भारत अ संघाचे कर्णधारपद भूषवणार आहे.
औरंगाबाद : वर्षानुवर्षे खोºयाने धावा फटकावत कमालीचे सातत्य राखणारा महाराष्ट्राचा शैलीदार फलंदाज अंकित बावणे हा धर्मशाळा येथे ४ ते ८ मार्चदरम्यान होणाºया देवधर करंडक क्रिकेट स्पर्धेत भारत अ संघाचे कर्णधारपद भूषवणार आहे.
मंगळवारी नवी दिल्ली येथे जाहीर झालेल्या भारत ब संघात अंकित बावणेचा समावेश करण्यात आला होता व आर. आश्विन याच्यावर भारत अ संघाच्या कर्णधारपदाची धुरा होती; परंतु आश्विन जखमी असल्यामुळे त्याला बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने एक आठवडे विश्रांतीचा सल्ला दिला आहे. त्यामुळे बीसीसीआयने अंकित बावणे याच्यावर भारत अ संघाच्या नेतृत्वाची धुरा सोपवली आहे. आर. आश्विन याच्या जागेवर निवड समितीने शाहबाज नदीम याला भारतीय अ संघात स्थान दिले आहे, तर भारत अ संघात आधी निवड झालेला अक्षदीप नाथ हा भारत ब संघाकडून खेळणार आहे. विशेष म्हणजे अंकित बावणे याने या रणजी हंगामात महाराष्ट्राचे कर्णधारपद भूषववले आहे.
वेळापत्रक
४ मार्च : भारत अ वि. भारत ब
५ मार्च : भारत ब वि. कर्नाटक
६ मार्च : भारत अ वि. कर्नाटक
८ मार्च : फायनल
विजय हजारे करंडकमध्ये उमटवला ठसा
देवधर करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय अ संघाच्या कर्णधारपदी निवड झालेल्या महाराष्ट्राच्या अंकित बावणे याने नुकत्याच झालेल्या विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेत आपला विशेष ठसा उमटवताना ७ सामन्यात ६१.२0 च्या जबरदस्त धावसरासरीने ३0६ धावा फटकावल्या आहेत.
त्यात अंकितने बिलासपूर येथे उत्तर प्रदेशविरुद्ध केलेल्या नाबाद ११७, त्रिपुरा संघाविरुद्ध निर्णायक लढतीत ५१ आणि मुंबईविरुद्ध उपांत्यपूर्व फेरीतील नाबाद ३७ धावांच्या खेळीचा समावेश आहे.
याच मालिकेदरम्यान कर्नाटकविरुद्धच्या लढतीदरम्यान अंकित बावणे याने त्याच्या वनडे कारकीर्दीतील २ हजार धावांचाही पल्ला गाठला होता.
अंकितने ६१ वनडे लढतीत ५ शतक व ८ अर्धशतकांसह ४१.७२ च्या सरासरीने २00३ धावा केल्या आहेत. तसेच ७८ प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये १७ शतके व २८ अर्धशतकांसह त्याने ५२.१0 च्या भक्कम सरासरीसह ५ हजार ३६७ धावा ठोकल्या आहेत.