अवैध वाळू वाहतुकीचे चार टिप्पर पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 11:50 PM2017-10-30T23:50:29+5:302017-10-30T23:50:45+5:30
उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर यांनी पुन्हा एकदा अवैध वाळू वाहतुकीकडे मोर्चा वळविला आहे. वाळूचे चार टिप्पर व एक ट्रॅक्टर पकडून ते पोलीस ठाण्यात जमा केले असून पुन्हा वाळू वाहतूक करणाºयांचे धाबे दणाणले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर यांनी पुन्हा एकदा अवैध वाळू वाहतुकीकडे मोर्चा वळविला आहे. वाळूचे चार टिप्पर व एक ट्रॅक्टर पकडून ते पोलीस ठाण्यात जमा केले असून पुन्हा वाळू वाहतूक करणाºयांचे धाबे दणाणले आहे.
हिंगोली जिल्ह्यात काही महिन्यांपूर्वीच जिल्ह्यातील घाटांवरील वाळू उपशाची मर्यादा संपली आहे. त्यातच नवे घाटही अजून लिलावात गेले नाहीत. काही दिवस परभणी जिल्ह्यातील घाटावरून वाळू आणून ती येथील ग्राहकांना दिली जात होती. त्यात अव्वाच्या सव्वा दर लागत असले तरीही ग्राहकही नाईलाजाने खरेदी करीत होते. शिवाय वाहनांसह यंत्रणा जागीच उभी राहिल्यास मोठा फटका बसण्याच्या भीतीने वाहनधारक मंडळीही हा धोका पत्करत होती. मात्र यात काहींनी अवैध वाहतुकीचा डाव साधणे सुरू केल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास येताच उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर यांनी दुचाकीवरून फेरी मारून चार वाहने पकडली. यात श्याम कदम यांची दोन हायवा वाहने क्र. एमएच ३८-३८३८, एम एच-३८ डी३१५ ही पकडली. त्यांचे चालक सुखदेव दीपके व कुमार आवारे यांना संतूक पिंपरी शिवारात पकडले. तर लिंबाळा मक्ता भागात साहेबराव कºहाळे यांचे विनाक्रमांकाचे ट्रॅक्टर व चालक संदीप कºहाळे, कय्यूमभाई यांचे एमएच-३८-२१२१ क्रमांकाचा हायवा व चालग गौतम दीपके, तर कय्यूभाई यांचेच टिप्पर क्र. एमएच-२0-बीटी-१५५९ व चालक नवनाथ वाठोरे यास पकडले आहे. चार टिप्पर व एका ट्रॅक्टरची अंदाजित किंमत १ कोटीच्या घरात जाणारी आहे. यात खेडेकर यांना तहसीलदार गजानन शिंदे, नायब तहसीलदार बोथीकर व इतरांच्या पथकाने सहकार्य केले.