बसच्या धडकेने कारचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:04 AM2020-12-22T04:04:46+5:302020-12-22T04:04:46+5:30

पुणे येथील सतीश बाळकृष्ण उपगंलवर यांनी शनिवारी पंढरपुरातील ग्रामपंचायत कार्यालयासमोर वाहतूक जाम झाल्याने कार (क्रमांक एम.एच.१२, के. ई.७६९०) उभी ...

Car damage due to bus collision | बसच्या धडकेने कारचे नुकसान

बसच्या धडकेने कारचे नुकसान

googlenewsNext

पुणे येथील सतीश बाळकृष्ण उपगंलवर यांनी शनिवारी पंढरपुरातील ग्रामपंचायत कार्यालयासमोर वाहतूक जाम झाल्याने कार (क्रमांक एम.एच.१२, के. ई.७६९०) उभी केली होती. यावेळी पाठीमागून भरधाव येणाऱ्या बस (क्रमांक एम.एच.१४, बी.ए.७९५७) चालकाने कारला जोराची धडक दिली. या अपघातात कारचे २२ हजारांचे नुकसान झाले असून, बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

------------------

मद्यविक्री व प्राशन करणाऱ्याविरुद्ध गुन्हा

वाळूज महानगर : रांजणगाव शेणपुंजी येथे मद्यविक्री करणारा व मद्य प्राशन करणाऱ्यांविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येथील दत्तनगर फाट्यावरील एका शेडमध्ये शनिवारी रांजणगाव येथील अख्तर शेख हा विनापरवाना मद्यविक्री करीत होता. या शेडमध्ये रांजणगाव येथील संजय गोरे व रफिक शेख हे मद्य प्राशन करताना पोलिसांना आढळले. या तिघांविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

------------------------

नायगावात चोरी; २० हजारांचा ऐवज लांबविला

वाळूज महानगर : अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून २० हजारांचा ऐवज लांबविल्याची घटना शनिवारी नायगावात घडली. सोमीनाथ कचरू भेंडे (रा.म्हसोबानगर, नायगाव) हे शनिवारी घरात झोपले असता अज्ञात चोरट्यांनी घराच्या दरवाजाचा कडी-कोंडा तोडून आत प्रवेश केला. १० हजार रुपयांचे दोन मोबाईल, तसेच १० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र व मणी लांबविले. याप्रकरणी वाळूज पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

----------------------

Web Title: Car damage due to bus collision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.