औरंगाबादेत महाविद्यालयीन विद्यार्थिनीला चिरडून पळालेल्या कार, टेम्पोसह चालकांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 09:23 PM2018-10-29T21:23:09+5:302018-10-29T21:23:36+5:30
महाविद्यालयात जाताना मोपेडस्वार वैभवी सुनील खिरड (१७) या विद्यार्थिनीला चिरडून पसार झालेल्या कार आणि टेम्पोचालकाला अटक करण्यात उस्मानपुरा पोलिसांना रविवारी रात्री अखेर यश आले.
औरंगाबाद : महाविद्यालयात जाताना मोपेडस्वार वैभवी सुनील खिरड (१७) या विद्यार्थिनीला चिरडून पसार झालेल्या कार आणि टेम्पोचालकाला अटक करण्यात उस्मानपुरा पोलिसांना रविवारी रात्री अखेर यश आले. कारचालकास सिंधीबन झोपडपट्टीतून तर टेम्पोचालकास दौलताबादेतून पोलिसांनी अटक केली. दोन्ही वाहनेही पोलिसांनी जप्त केली.
कारचालक सुभाष भानुदास बोडखे (३३, रा. कुंभारगल्ली, दौलताबाद) आणि टेम्पोचालक भाऊसाहेब तुकाराम साळवे (४४, रा. सिंधीबन झोपडपट्टी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस निरीक्षक हेमंत कदम म्हणाले की, चाणक्यपुरीतील रहिवासी वैभवी २४ आॅक्टोबरला सकाळी साडेआठच्या सुमारास मोपेडवरून शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात जाताना पीरबाजार रस्त्यावरील भाजीवालीबाई चौकात अज्ञात वाहनाने चिरडल्याने ठार झाली होती. तिला उडविणारी वाहने अपघातानंतर पसार झाली होती. पोलीस त्या वाहनांचा शोध घेत होते. तेथील खाटकाच्या दुकानावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांत अपघात कैद झाला होता. तिला पांढºया रंगाच्या कारने उडविले आणि विटाची वाहतूक करणाºया टेम्पोने चिरडल्याचे स्पष्ट झाले होते. कॅमेºयाच्या फुटेजमुळे दोन्ही वाहनांचे अर्धवट क्रमांक पोलिसांना मिळाले. पोलिसांनी खबºयाला कामाला लावले. वैभवीच्या नातेवाईकांशी बोलून अपघातामधील वाहनांबाबत काही माहिती मिळते का, हे पाहण्यास सांगितले. औरंगाबादेत टेम्पोने दौलताबादेतून विटा येतात. त्यावरून दौलताबाद येथील खबºयाला कामाला लावले. बोडखे चालवीत असलेल्या टेम्पोने हा अपघात केल्याचे खबºयाकडून समोर आले. घटनेपासून बोडखेने त्याचा टेम्पो (एमएच-२० सीटी ७६०६) एका ठिकाणी उभा करून ठेवल्याचे समजले. पोलीस उपनिरीक्षक राहुल चव्हाण, कल्याण शेळके आणि कर्मचाºयांनी रविवारी रात्री दौलताबाद गाठून बोडखेला अटक केली. त्याच्या ताब्यातून टेम्पोही जप्त करून शहरात आणला. तपासादरम्यान वैभवीला उडविणारी कार भास्कर मुरमे (रा. सिंहगड कॉलनी, सिडको एन-६) यांच्या मालकीची असल्याचे स्पष्ट झाले. त्यांचा कारचालक साळवे अपघात झाल्यानंतर दोन दिवसांपासून कामावर आला नसल्याचे पोलिसांना समजले. पोलिसांनी कारमालक मुरमे यांच्याशी संपर्क साधून कार जप्त केली. या अपघाताविषयी मुरमे यांना काहीच माहिती नव्हती. त्यामुळे ते बिनधास्तपणे कार वापरत होते. सिंधीबन येथे सापळा रचून पोलिसांनी चालक साळवेला अटक केली.
विजयनगर चौकाकडे जात होता टेम्पो
सुभाष बोडखे त्या दिवशी सकाळी विटा भरलेला टेम्पो विजयनगर चौकाकडे घेऊन जात होता. रेल्वेस्टेशनमार्गे शहानूरमियां दर्ग्याकडे जाताना भाजीवालीबाई चौकातच अपघात झाला. टेम्पोच्या मागील चाकाखाली येऊन वैभवी ठार झाली. अपघात घडला त्यावेळी तेथे कोणीही नसल्याने आपण पळून गेल्याचे टेम्पोचालक बोडखेने पोलिसांना सांगितले.
मुलीला शिकवणीला सोडून निघाला होता कारचालक
कारमालक मुरमे यांच्या मित्राच्या मुलीला उस्मानपुºयातील कोचिंग क्लासमध्ये सोडून कारचालक साळवे परत रेल्वेस्टेशनकडे जात होता. त्याचे कारवरील नियंत्रण सुटले आणि चाणक्यपुरीकडून रेल्वेस्टेशनकडे जाणाºया मोपेडस्वार वैभवीला त्याने उडविले. पकडल्या जाण्याच्या भीतीपोटी तेथे न थांबता तो पसार झाला.
प्रत्यक्षदर्शींनी घेतली बघ्याची भूमिका
अपघातानंतर दोन्ही वाहने दोन ते चार मिनिटे घटनास्थळी थांबली होती. लोकही जमले. मात्र त्यांनी केवळ बघ्याची भूमिका घेतल्याने त्या वाहनांना पळून जाता आले.
दोन्ही चालकांना जामीन
वैभवीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून रविवारी रात्री कारचालक साळवे आणि टेम्पोचालक बोडखेविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. सोमवारी दुपारी दोन्ही आरोपींना उस्मानपुरा पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने त्यांची जामिनावर मुक्तता केली. अपघातप्रसंगी वाहनामध्ये आणखी कोण होते, याबाबतचा तपास केला जात आहे, अशी माहिती पो.नि.कदम यांनी दिली. ही कारवाई उपनिरीक्षक चव्हाण, शेळके, कर्मचारी प्रल्हाद ठोंबरे, मनोज बनसोडे, संतोष शिरसाट, संजयसिंग ढोबाळ यांनी केली.