चक्क तिकीट घरासमोरच केली कार पार्किंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:04 AM2021-07-30T04:04:06+5:302021-07-30T04:04:06+5:30
लासूर स्टेशन : घाणीचे साम्राज्य, सुविधांचा अभाव अशी ओळख असलेल्या लासूर स्टेशनची इमारत आता वाहनतळ बनले आहे. चक्क रेल्वे ...
लासूर स्टेशन : घाणीचे साम्राज्य, सुविधांचा अभाव अशी ओळख असलेल्या लासूर स्टेशनची इमारत आता वाहनतळ बनले आहे. चक्क रेल्वे तिकीट घराजवळ कार पार्किंग केल्याने प्रवाशांनी नियमांना केराची टोपली दाखविली आहे. रेल्वे प्रशासन या कार मालकावर कारवाई करणार का, याकडे लक्ष लागले आहे.
आता नियमित रेल्वेसेवा सुरू झाली आहे. रेल्वे प्रशासनाची नियमावली तशी कडकच असते. कोणालाही रेल्वे स्टेशन मध्ये वाहन पार्किंग करण्याची परवानगी नाही. अपंगांचा अपवाद वगळता कोणालाही रेल्वेस्थानकाच्या इमारतीपर्यंत वाहन घेऊन जाता येत नाही. परंतु गुरूवारी दुपारी कार (क्रमांक एम.एच. २० ईजे ३४७५) च्या चालकाने नियमांचे उल्लंघन करून रेल्वे स्थानकामधील तिकीट घराच्या जवळच कार पार्किंग केली. या घटनेची सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. ही कार औरंगाबाद शहरातील एका व्यक्तीची आहे. कार क्रमांकावरून मालकाचे नाव शोधत त्यावर रेल्वे प्रशासन कारवाई करणार आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
290721\img-20210729-wa0046.jpg
लासूर स्टेशन येथील रेल्वे स्टेशन मध्ये उभा राहीलेली कार