पशुवैद्यकीय दवाखान्यात जनावरांची हेळसांड

By Admin | Published: June 25, 2014 11:55 PM2014-06-25T23:55:53+5:302014-06-26T00:34:36+5:30

कडा: आष्टी तालुक्यातील कडा येथील पशुवैद्यकीय दवाखान्यातील डॉक्टर अनेकदा गैरहजर असतात.

The care of animals in the veterinary hospital | पशुवैद्यकीय दवाखान्यात जनावरांची हेळसांड

पशुवैद्यकीय दवाखान्यात जनावरांची हेळसांड

googlenewsNext

कडा: आष्टी तालुक्यातील कडा येथील पशुवैद्यकीय दवाखान्यातील डॉक्टर अनेकदा गैरहजर असतात. यामुळे उपचारासाठी आणलेल्या जनावरांची हेळसांड होते. डॉक्टर नसल्याने उपचाराची भिस्त शिपायावरच असते.
आष्टी तालुक्यातील कडा येथील जि.प. पशुसंवर्धन विभागांतर्गत असलेल्या पशुवैद्यकीय श्रेणी -१ चा दवाखाना आहे. या दवाखान्यांतर्गत डोंगरगण, केरूळ, शेरी, कडा या परिसरातील जनावरांवर उपचार करण्यात येतात. असे असले तरी या गावात लाळ्या, खुरकूत, लसीकरण आदी कामांसाठी डॉक्टर क्वचितच जात असल्याचे दिसून येत आहे. यामुळे पशुपालकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
अनेकदा शेती मशागतीचे काम करीत असताना बैल जखमी होतात. अशा वेळी त्यांना कडा येथील दवाखान्यात आणण्यात येते. नेमके यावेळी दवाखान्यात डॉक्टर हजर नसल्याने पशुंवर शिपायांकडून उपचार करून घ्यावे लागतात. अनेकदा जनावरांना गंभीर इजा असल्यास किंवा इतर काही गंभीर आजार असल्यास वेळ प्रसंगी खाजगी डॉक्टरांचीही मदत घ्यावी लागते. यासाठी शेतकऱ्यांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी करण्याची मागणी सचिन वाघुले, दादा जगताप यांनी केली. या रूग्णालयात गेले असता उपस्थित असलेल्या शिपायाने सांगितले की, डॉक्टर रजेवर गेले आहेत. तर तालुका पशुधन अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता भ्रमणध्वनीवर संपर्क होऊ शकला नाही. (वार्ताहर)
खाजगी डॉक्टरांकडून करावे लागतात उपचार
कडा येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात कडासह डोंगरगण, केरूळ, शेरी या भागातील पशुंवर केले जातात उपचार.
अनेकदा दवाखान्यात डॉक्टर हजर नसल्याने शिपाईच करतो उपचार.
पशुंना गंभीर इजा असल्यास खाजगी डॉक्टरांची घ्यावी लागते मदत.

Web Title: The care of animals in the veterinary hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.