दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळाल्या करिअरच्या वाटा
By Admin | Published: May 20, 2014 01:27 AM2014-05-20T01:27:37+5:302014-05-20T01:34:00+5:30
औरंगाबाद : लोकमत आणि कॉम्पिटिशन पॉइंटतर्फे दहावीचे विद्यार्थी तसेच पालकांसाठी ‘फलश्रुती-२०१४’ या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
औरंगाबाद : लोकमत आणि कॉम्पिटिशन पॉइंटतर्फे दहावीचे विद्यार्थी तसेच पालकांसाठी ‘फलश्रुती-२०१४’ या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना दहावीनंतर करिअरच्या कोणकोणत्या संधी उपलब्ध होऊ शकतात. कोणत्या क्षेत्राची निवड करावी यासंदर्भात कॉम्पिटिशन पॉइंटचे प्रा. राजन वाळवे, प्रा. जय, संतोष कारले यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. विद्यार्थी दहावीला गेल्यानंतर पालकांची चिंता वाढू लागते. आपल्या पाल्याचे कोणत्या क्षेत्रात करिअर करावे, असा विचार सुरू असतो. विद्यार्थी आणि पालकांना योग्य दिशा मिळत नाही. सर्वसामान्यांची ही अडचण डोळ्यासमोर ठेवून लोकमततर्फे ‘फलश्रुती २०१४’चे आयोजन केले होते. या कार्यशाळेस शहरातील विद्यार्थी आणि पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यशाळेत दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनी कोणत्या क्षेत्रात करिअर करायचे आणि त्याची तयारी कशी करायची याची माहिती देण्यात आली. आजच्या स्पर्धात्मक युगात कसे टिकून राहायचे, त्यासाठी कशी मेहनत करावी लागेल यासंबंधीच्या उत्कृष्ट टिप्स विद्यार्थ्यांना देण्यात आले. स्पर्धा परीक्षांमध्ये जेईई मेन, जेईई अॅडव्हान्स, आयआयटी, एनआयटी, पीएमटी, एएलएलएमएस, एसएटी आणि इतरही काही परीक्षांसाठी कशी तयारी करावी यावरही मार्गदर्शन करण्यात आले. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्याच्या योग्य पद्धतीसंदर्भात प्रा. राजन वाळवे यांनी माहिती दिली. याआधीच्या पिढीला करिअरसंदर्भात शेजार्यांकडून माहिती घ्यावी लागत होती. आजच्या पिढीला वेगवेगळ्या क्षेत्रांतील तज्ज्ञ मार्गदर्शन करायला उपलब्ध आहेत. या संधीचे विद्यार्थ्यांनी सोने करावे आणि आपले करिअर उत्कृष्ट घडवावे, असेही त्यांनी सांगितले. करिअरच्या संदर्भात निर्णय तज्ज्ञांकडूनच घ्यावा, असा सल्लाही देण्यात आला. प्रा. जय यांनी ‘करिअरच्या विविध संधी आणि बदलते आयाम’ यावर सविस्तर विवेचन केले. मराठवाड्यातील विद्यार्थी हे स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने मागे आहेत. या स्पर्धा परीक्षांमध्ये तयारी कशी करावी, मार्किंग वाढविण्यासंदर्भात माहिती दिली. करिअर कौन्सिलर संतोष कारले यांनी विद्यार्थी व पालकांचे समुपदेशन केले. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करायचा विचार करीत असाल तर अभ्यासाचा ताण वाढेल. याविषयी आधीपासूनच नियोजन असायला हवे. या नियोजनानुसार इयत्ता आठवीपासूनच आपल्या अंगी असलेल्या सकारात्मक बाबी ओळखाव्यात, पालक, शिक्षक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे, असेही त्यांनी सांगितले. लकी ड्रॉ विजेत्यांची नावे १. प्रसाद शिंदे , १४. आदित्य भागवत, ६०. राम खरात, ६१. वेदांत मोगली, ९४. जान्हवी बोकन, ९५. अश्विनी तुपे, ९८. मधुमिता बजाज ११६. स्वराज चेडे, १८४. साक्षी श्रीरामवार, २००. सौरभ